लग्न आहे आणि त्याच डान्सच झालाच नाही असं कधी होईल का? डान्सशिवाय आपल्या देशात लग्न हे अपूर्णच आहे. नवरदेवाची बाजू असो किंवा नवरीची…मित्रमंडळी आणि दोन्ही बाजूचे नातेवाईक हे लग्नाच्या वरातीत डान्स करण्यासाठी कायम पुढेच असतात. लग्नातील डान्सचे अनेक व्हिडीओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. यापैकी काही डान्स खरोखरंच अप्रतिम असतात आणि हेडलाईन्समध्ये येत असतात. त्याच वेळी, काही डान्स देखील असे असतात ज्याचे व्हिडीओ शेअर केल्या केल्याच व्हायरल होत असतात आणि इतरांना खूप हसवतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हायरल व्हिडीओ दाखवणार आहोत, ज्यामध्ये एका मुलाचा डान्स पाहून तुम्हाला हसू फुटेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नवरदेवासोबत जाऊन बसतो
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला वरात निघणार असल्याचं दिसत आहे. घोडी उभी आहे, नवरदेव घोडीवर बसलेला दिसून येत आहे, आजुबाजुला लोक उभे आहेत. इतक्यात एक मुलगा येऊन नवरदेवासोबत घोडीवर बसतो. आता घोडीवर बसताच तो अशा पद्धतीने नाचू लागतो की नवरी-नवरदेव सुद्धा हसायला लागतात.

आणखी वाचा : चक्क विमानातच एअर होस्टेसने केला ‘Pushpa’ डान्स, एका चुकीमुळे आली चर्चेत, पाहा हा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : बकरीसोबत व्हिडीओ शूट करणं पडलं महागात, मग पुढे जे झालं ते पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही

खरं तर हा मुलगा नवरदेवाच्या पुढे घोडीवर बसतो. हा मुलगा रबरासारखा इकडून तिकडे सरकत सापासारखा नाचू लागतो. हे पाहून तेथे उपस्थित काही लोक व्हिडीओ बनवू लागले. या डान्सचा आनंद वरातीत उपस्थित लोकांनी तर घेतलाच, पण हा व्हिडीओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लोक कमेंट करत आहेत. काही युजर्स हा व्हिडीओ पुढे इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny dance on wedding video getting viral watch this trending news prp