सध्याच्या घडीला सोशल मीडियावर जर कोणता ट्रेंड लोकांच्या डोक्यात फिरत असेल तर तो बंगाली गाणं ‘कच्चा बदाम’. गेल्या पाच महिन्यांपासून सोशल मीडियावर अधिराज्य गाजवणाऱ्या या गाण्याने सर्वसामान्यांनाच नव्हे, तर बड्या सेलिब्रिटींनाही नाचायला भाग पाडले आहे. या गाण्याची क्रेझ काही थांबण्याचं नाव घेत नाहीय. आता या गाण्यावरचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक महिला या गाण्यावर चक्क नागिन डान्स केलाय. या व्हिडीओमुळे ‘सोशल मीडियाच्या जगात’ एकच चर्चा रंगलीय. गंमत म्हणजे या व्हिडीओमध्ये डान्स करताना महिलेला कसलंच भान राहत नाही. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव देखील पाहण्यासारखे आहेत.
आपल्या देशात वेगवेगळ्या पद्धतीच्या डान्सचे व्हिडीओ हे सोशल मीडियावर दररोज शेअर होत असतात आणि ते व्हायरल देखील होतात. लग्न कार्य असो किंवा मग एखादी पार्टी असो…प्रत्येक सोहळ्यात एक डान्सची चर्चा फार रंगते तो म्हणजे नागिन डान्स. काही लोकांना डान्सची फारच हौस. नागिन डान्सची धून वाजली की काही लोकांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही आणि मग त्या धूनवर नागिन डान्स करत डोलू लागतात. पण काही लोक नागिन डान्स करता करता आऊट ऑफ कंट्रोल होऊन जातात आणि मग त्यांचा विचित्र डान्स पाहून अक्षरशः आपल्याला हसू आवरत नाही. पण सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यामध्ये महिला कोणत्याही नागिन डान्सच्या धूनवर नव्हे तर सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ‘कच्चा बादाम’ या सुपरहिट गाण्यावर नागिन डान्स केलाय. आता तुम्ही म्हणाल, ‘कच्चा बादाम गाण्यावर नागिन डान्स कसं शक्य आहे?’. त्यासाठी तुम्हाला व्हायरल व्हिडीओ पाहावा लागेल.
आणखी वाचा : तुम्ही कधी इच्छाधारी नागिन पाहिलीय का? मग हा व्हायरल व्हिडीओ एकदा बघाच
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला अगदी बेधुंद होत ‘कच्चा बादाम’ गाण्यावर डान्स करताना दिसून येतोय. या गाण्यावर नागिन डान्स करताना ती दिसतेय. यावेळी महिला नागिनीचा फणा काढतेय. महिलेने नागिनीचा फणा काढल्यानंतर तिचा हाहाकारी डान्स पाहून घाबरून पळताना दिसून येत आहेत. याचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. हा डान्स व्हिडीओ पाहून लोकांना हसू आवरता येणं अवघड झालंय. लोक हा व्हिडीओ वारंवार पाहून व्हिडीओचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
आणखी वाचा : गिधाडाला तुम्ही कधी पोहताना पाहिलंय का? मग हा VIRAL VIDEO पाहाच
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ना लाल माती, ना फड, पण या दोन उंदरांची कुस्ती जबरदस्त, पाहा VIRAL VIDEO
‘कच्चा बदाम’ गाण्यावर आतापर्यंत वेगवेगळ्या डान्सचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. पण या गाण्यावर नागिन डान्स तुम्ही कदाचित पहिल्यांदाच बघत असाल. हा डान्स व्हिडीओ ‘तितली__माही’ नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ४ लाख ९२ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर १७ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ एन्जॉय करतानाच लोक या व्हिडीओवर प्रतिक्रियाही देत आहेत.