सोशल मीडियावर सध्या एका चोराचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. घरात चोरी करण्यासाठी घुसलेल्या चोरासोबत घडलेला प्रकार पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. चोरी ही फसवणूकीची घटना आहेच, पण चोरी करणारे चोरही कधी कधी फसतात. त्यांची झालेली फजिती पाहून लोकांना इतका आनंद होतो की त्यांच्या तोंडून एकच शब्द निघतो, चोरांसोबत असंच झालंच पाहिजे. हा व्हायरल व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा हेच म्हणाल.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, घराचा दरवाजा बंद पाहून एक चोरटा चोरीच्या उद्देशाने घरात घुसण्याचा प्रयत्न करतो. घराच्या आजूबाजूला कोणी नसलेलं पाहून तो सुरूवातीला दारावर बसलेल्या लोखंडाच्या जाळीर चढतो आणि छतावर चढण्याचा प्रयत्न करू लागला. तो छतावर चढण्याआधीच डॉगी घराच्या आतून दरवाजापर्यंत पोहोचतात. खाली आपल्या अंगावर भुंकत असलेले दोन डॉगी पाहून चोर पुरता अडकून जातो. चोर खाली उतरून पळून जाण्याच्या बेतात असताना बाहेरून कुत्रे येऊन दाराखाली उभा राहतात. यानंतर फ्रेममध्ये जे दिसतं ते पाहण्यासाठी फारच मजेदार आहे.
आणखी वाचा : धरणाची ३० फूट उंच भिंत चढण्याचा स्टंट तरूणाच्या अंगलट, धाडकन खाली पडला, पाहा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : वडिलांची सेकेंड हॅंड सायकल पाहून आनंदाने उड्या मारू लागला चिमुकला, पाहा हा VIRAL VIDEO
घराच्या आत आणि घराबाहेर दोन्ही कुत्रे चोर खाली येण्याची वाट पाहत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसून येतं. बिचारा चोर दारावरंच टांगलेला राहतो. हा मजेदार व्हिडीओ gieddee नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह लोकांना आवरता येत नाहीय. लोक या व्हिडीओवर चोराची झालेली फजिती पाहून मजेदार प्रतिक्रिया शेअर करताना दिसून येत आहेत.