लग्नानंतर जेव्हा निरोपाची वेळ येते तेव्हा वधूचे कुटुंबीय आणि नातेवाईक खूप भावूक होतात. मुलीला सासरी जाताना पाहून सगळे रडायला लागतात. वधूचा निरोप हा सर्वात भावनिक क्षण असतो. कधी कधी वधूसोबत वरही रडताना दिसतो. तथापि, हे फार क्वचितच घडते, जेव्हा विदाईच्या वेळी वधूचे कुटुंब भावनिक होत नाही. होय, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये असेच काहीसे पाहायला मिळाले.
नक्की काय झालं?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, लग्नानंतर वधूचे सर्व नातेवाईक बाहेर उभे होते आणि वधू गाडीत बसल्याचे दिसून येते. मात्र, यावेळी कोणीही भावनिक दिसले नाही. वधू कारमध्ये बसते तेव्हा तिच्या आजूबाजूला उभे असलेल्यांना पाहून तिला आश्चर्य वाटते. साधारणपणे वधूला निघताना पाहून नातेवाईकांच्या डोळ्यात अश्रू येतात, मात्र असे काहीही येथे दिसले नाही. त्यामुळे वधू बाहेर उभ्या असलेल्या लोकांना म्हणाली, ‘तुमच्यापैकी कोणी का रडत नाही? रडा.’
(हे ही वाचा: IPL 2022: कृणालने हार्दिकची विकेट घेताच सोशल मीडियावर आला मीम्सचा पूर!)
(हे ही वाचा: गोरिलावर चढला ‘पुष्पा’ फिवर! ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या हुकस्टेप करतानाचा Video Viral)
नातेवाइकांनी केली चेष्टा
वधूचे बोलणे ऐकून बाहेर उभ्या असलेल्या बायका हसल्या. यादरम्यान एका महिलेने असे काही बोलले, जे ऐकून वधूला अपमान वाटला. तथापि, वधूला मजेदार पद्धतीने उत्तर देण्यात आले. एक महिला म्हणाली, ‘आम्ही कशाला रडायचे, आमचा मेकअप खराब होईल.’ हे ऐकून शेजारी उभे असलेले सर्व नातेवाईक हसू लागले व वधूही हसू लागली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. हा व्हिडीओ ४५ लाखांहून अधिक लोकांनी लाइक केला आहे.