Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.टेन्शनमधून रिलीज व्हायचे असेल तर बरेचजण काहीबाही उपाय सांगत असतात. त्यातलाच एक जालीम इलाज काय माहिती आहे? बस्स, ट्रकच्या मागे लिहिलेल्या शायरी किंवा संदेश वाचा. चेहऱ्यावर नक्की हसू फुलेल. देशभरात फिरणाऱ्या या ट्रकची खासियत म्हणजे त्यांवर लिहिलेली शायरी. अशाच एका चालकानं गाडीवर असं काही लिहलं की, वाचून पोलिसांनीही गाडी थांबवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. गाड्यांच्या मागच्या वाक्यांचे व्हिडीओ अनेकवेळा व्हायरल होत असतात. तुम्ही स्वत:ही अनेकवेळा प्रत्यक्षात पाहिलंच असेल. दरम्यान अशाच एका गाडीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Viral Video of some grandmothers making reel on trending song video goes viral on social media
“आहा हा हा…यमाडी यमाडी तुईडीक रे” ट्रेंडिंग गाण्यावर आजीबाईंची जबरदस्त रील; VIDEO पाहून म्हणाल “असं आयुष्य जगा”
14 December Rashi bhavishya In Marathi
१४ डिसेंबर पंचांग: आज १२ पैकी ‘या’ राशींवर…
Funny video The Little Girl Requests Alexa To Use Abusive Language But She Receives A Funny Reply Video Goes Viral
VIDEO: “Alexa शिव्या दे ना…”, चिमुकलीच्या विनंतीवर अ‍ॅलेक्साने दिलं जबरदस्त उत्तर; ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल
Police scolded truck driver for writing shayari on truck viral video on social media
तू एवढा देखणा आहेस? ट्रकवर लिहलेली शायरी पाहून रस्त्यातच अडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा पोलिसांनी नेमकं काय केलं
a woman forgot her husband while talking on a call
मोबाईलच्या नादात चक्क नवऱ्याला विसरली, पेट्रोल पंपावर आली नवऱ्याबरोबर पण.. VIDEO होतोय व्हायरल
Gas tanker blast on a Road
अशा वेळी चार हात नाही तर चार किमी दूर रहा! भर रस्त्यात गॅस टँकरचा स्फोट; थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल
Shocking video Boy sitting at a bus stop was hit by a bus video goes viral
बस स्टॉपवर बसलेल्या तरुणावर ड्रायव्हारने घातली बस; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप; VIDEO पाहताना सावधान
viral video of desi jugaad
पायऱ्यांवरून सामान उतरवण्याचं टेन्शन दूर; ‘त्यानं’ शोधला असा जुगाड की… VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या गाडी मालकानं मुलींना इम्प्रेस करण्यासाठी आपल्या गाडीवर “देख मत पगली प्यार हो जायेगा” असं लिहलं आहे. हे वाचून पोलिसांनी गाडी थांबवली आणि त्याला विचारलं “असं का लिहलं आहेस एवढा सुंदर आहेस का तू? की तुझ्याकडे पाहून प्रेम होईल.” यावेळी तो मालकंही हसायला लागला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “ज्याला बाप कळला त्याला जग कळलं” चिमुकल्यानं वडिलांच्या वाढदिवसाला काय केलं पाहा; VIDEO पाहून डोळ्यांत पाणी येईल

एरवी, ट्रक व त्यांचे चालक शांतपणे आराम करताना पाहायचे असतील तर ढाबेच गाठावे लागतात. कारण, रस्त्यावर ते सतत धावत असतात.ट्रकचालक, क्लीनर सहा-सहा महिने घराच्या बाहेर असतात. ट्रक हेच आपले घर वाटावे, आपल्या मनातले इतरांना कळावे, हाच या पेंटिंगमागचा उद्देश. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आपल्या ट्रकवरील नितांत प्रेम. इतर ट्रकपेक्षा आपला ट्रक एकदम मस्त दिसला पाहिजे, हाही उद्देश असतोच.काही हौशी चालक-मालक गाडीच्या मागे शायरीतून संदेश देत असतात.

Story img Loader