Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.टेन्शनमधून रिलीज व्हायचे असेल तर बरेचजण काहीबाही उपाय सांगत असतात. त्यातलाच एक जालीम इलाज काय माहिती आहे? बस्स, ट्रकच्या मागे लिहिलेल्या शायरी किंवा संदेश वाचा. चेहऱ्यावर नक्की हसू फुलेल. देशभरात फिरणाऱ्या या ट्रकची खासियत म्हणजे त्यांवर लिहिलेली शायरी. अशाच एका चालकानं गाडीवर असं काही लिहलं की, वाचून पोलिसांनीही गाडी थांबवली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा