Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टेन्शनमधून रिलीज व्हायचे असेल तर बरेचजण काहीबाही उपाय सांगत असतात. त्यातलाच एक जालीम इलाज काय माहिती आहे? बस्स, ट्रकच्या मागे लिहिलेल्या शायरी किंवा संदेश वाचा. चेहऱ्यावर नक्की हसू फुलेल. देशभरात फिरणाऱ्या या ट्रकची खासियत म्हणजे त्यांवर लिहिलेली शायरी.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. ट्रकच्या मागच्या वाक्यांचे व्हिडीओ अनेकवेळा व्हायरल होत असतात. तुम्ही स्वत:ही अनेकवेळा प्रत्यक्षात पाहिलंच असेल. दरम्यान अशाच एका ट्रकचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. सध्या देशभरात निवडणुकांचं वातावरण आहे अशातच ट्रकच्या मागे लिहलेलं हे स्लोगन प्रचंड व्हायरल होतंय.या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे आम्हाला निवडणून येऊद्या मग बघा असं म्हंटलं आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणानं २ तास दार उघडलं नाही; मित्रांनी बोलवले पोलीस अन्..शेवट पाहून व्हाल लोटपोट

एरवी, ट्रक व त्यांचे चालक शांतपणे आराम करताना पाहायचे असतील तर ढाबेच गाठावे लागतात. कारण, रस्त्यावर ते सतत धावत असतात.ट्रकचालक, क्लीनर सहा-सहा महिने घराच्या बाहेर असतात. ट्रक हेच आपले घर वाटावे, आपल्या मनातले इतरांना कळावे, हाच या पेंटिंगमागचा उद्देश. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, आपल्या ट्रकवरील नितांत प्रेम. इतर ट्रकपेक्षा आपला ट्रक एकदम मस्त दिसला पाहिजे, हाही उद्देश असतोच.काही हौशी चालक-मालक गाडीच्या मागे शायरीतून संदेश देत असतात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny slogan written behind indian trucks election fever video goes viral on social media srk
Show comments