Viral Photo: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन खूप व्हायरल होतात. ट्रकच्या मागे वेगवेगळ्या प्रकारच्या पाट्या पाहून हे सगळे ट्रक पुण्याचेच आहेत की काय असाही प्रश्न पडतो.‘मेरा भारत महान’ आणि हॉर्न ओके तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘शेरो शायरी, म्हणी, टोमणे. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.
रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान महामार्गावरील एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
ट्रकच्या मागे लिहला खतरनाक मेसेज
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “अगर खुदा ने चाहा तो मंजिल तक पहुँचा दूँगा,अगर नजर चूकी तो माँ कसम खुदा से मिला दूँगा।” म्हणजेच, जर देवाला वाटलं तर तुम्हाला जिथे जायचंय तिथे पोहचवेन पण जर नजर हटली तर थेट देवाशीच भेट घालून देईन. हा मेसेज वाचून इतर वाहन चालक या ट्रकपासून अंतर ठेऊनच गाडी चालवत आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी फोटोवर भरभरून कमेंट्स करत आहेत. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. याच पार्श्वभूमीवर ट्रक मालकानं ही सूचना लिहली आहे असं दिसतं.
पाहा फोटो
हेही वाचा >> VIDEO: खरंच परिस्थितीसमोर झुकावं लागतं! दिवाळीचे दिवे विकताना चिमुकल्याची इच्छाशक्ती पाहून म्हणाल “लेक असावा तर असा”
हा फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या फोटोला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.