Viral video: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, “सावकाश ये भावा लोन अजून शिल्लक आहे आणि मालक गरीब आहे” ‘अतिघाई संकटात नेई’ असे म्हणतात. अनेकवेळा पुढे जाण्याच्या नादात अनेक जण चुकीच्या पद्धतीनं गाडी चालवतात आणि अपघात होतात. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. याच पार्श्वभूमीवर ट्रक मालकानं ही सूचना लिहली आहे असं दिसतं.

याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी या व्हिडीओवर भरभरून कमेंट्स करत आहेत.

पाहा पाटी

हेही वाचा >> “आयुष्यात एका सेंकदाचं महत्त्व काय?” सोशल मीडियावर व्हायरल होणारा ‘हा’ VIDEO बघून झोप उडेल

हा व्हिडिओ सोशल मीडियावर said_mulla__313 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून वेगाने व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओला लोक खूप पसंत करत आहेत. अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny slogan written behind indian trucks video goes viral on social media srk 1