आता इशांत शर्मा असा चेहरा का करतोय हे तुमच्यापर्यंत पोचलंच असेल. नसेल तर एेका.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत विरूध्द आॅस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताची बॅटिग कोसळली आहे खरी. पण बाॅलर्सनी अजून हार मानलेली नाही. आॅस्ट्रेलियाचा तडाखेबंद बॅट्समन स्टीव्ह स्मिथला इशांत शर्माने काही मस्त बाॅल्स टाकले. त्यानंतर या दोघांमध्ये नजरानजर झाली आणि स्टीव्ह स्मिथने दिलेल्या रिअॅक्शनवरून इशांतने असं काही त्याला वेडावून दाखवलं की तो चर्चेचा विषय ठरला. हे जे काय इशांतने केलं ना ते भारी होतं.

आता असं काही झालं की नेहमीप्रमाणे ट्विटरवर धमाल ट्वीट्स तर येतातच. सादर आहेत ट्विटवर पडीक असणाऱ्या तुम्हा-आम्हासारख्या लाखो सुपीक फुकट्यांपैकी काही रिअॅक्शन्स

१. अमिताभ बच्चन (अभिषेकला): “गधड्या असे हावभाव करतात? तो शर्मां अंकलचा इशांत बघ कसे एक्स्प्रेशन्स देतो ते”

 

२. आता देशभर महिला त्यांच्या मुलांना त्यांनी कटकट केली की इशांत शर्माची भीती दाखवतील

 

 

३. जाॅब इंटरव्हूदरम्यान…

 

 

४. आता चांगली बाॅलिंग टाकली तर पुढच्या ७५ टेस्टसाठी माझं टीममधलं स्थान पक्कं

आजच्या या प्रसंगानंतर विनोदी ट्वीट्सची लाट अजूनही येणार आहे. त्यामुळे मॅचसोबतच तिकडेही लक्ष ठेवा!

VIDEO: पाकिस्तानचा आणखी एक चक्रम पत्रकार!