Funny video viral: आई ओरडली, बाबांनी मारलं किंवा आई-बाबांनी काही दिलं नाही तर सामान्यपणे मुलं आपल्या वडिलांकडे, आजी-आजोबांकडे किंवा कुटुंबातील इतर सदस्यांकडे तक्रार करतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एक चिमुकला वडिलांविरोधात तक्रार करण्यासाठी थेट पोलिसात पोहोचला. पोलीस ठाण्यात वडिलांविरोधात तक्रार करायला गेलेल्या या चिमुकल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. पोलीस ठाण्यात तुम्ही मोठ्या माणसांना चोरी, मारहाण अशी तक्रार देताना पाहिलं असेल. पण हा मुलगाही पोलीस ठाण्यात पोहोचला. त्याच्या वडिलांनी असं काही केलं की त्याने थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली. वडिलांविरोधात त्याने पोलिसांकडे तक्रार केलीच पण सोबतच त्यांना तुरुंगात टाकण्याची मागणीही केली. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.
तक्रार ऐकून पोट धरुन हसाल
मध्य प्रदेशच्या धार येथील एव व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक छोटासा मुलगा पोलीस ठाण्यात दिसतो आहे. खुर्चीत बसलेल्या पोलिसांकडे तो रडत रडत तक्रार करत आहे.पोलिस अधिकाऱ्यांनी मुलाचं नाव विचारल्यावर त्याने त्याचं नाव हसनैन असं सांगितलं आहे. तो त्याचे वडिल इकबाल यांची तक्रार करण्यासाठी पोहोचला आहे. चिमुकल्याची तक्रार ऐकून पोलिसांनाही हसू रोखता आलं नाही. चिमुकल्याने पोलिसांना म्हटलं की, त्याचे वडील त्याला रस्त्यावर फिरू देत नाहीत. नदी किनारी जाऊ देत नाहीत. म्हणून तो त्यांच्यावर नाराज आहेत. आश्चर्य म्हणजे, या चिमुकल्याने वडिलांवर कारवाईची मागणीही केली आहे. त्यांना जेलमध्ये बंद करा, असंही तो सांगतोय. मुलगा ज्या निरागसपणे वडिलांची तक्रार करत आहे ते ऐकून पोलिस ठाण्यातही एकच हशा पिकला होता.
मुलाची ही क्युट तक्रार ऐकून पोलीसही त्याचं म्हणणं ऐकण्यापासून आणि त्याची तक्रार नोंदवण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. हसत हसत त्यांनी त्याची तक्रार लिहून घेतली आणि आपण लवकरात लवकर कारवाई करू असं या चिमुकल्याला सांगितलं.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: कोल्हापुरात आई समोरच मुलावर तलवारीने सपासप वार; पोटच्या गोळ्यासाठी आई हल्लेखोरांना भिडली, शेवटी काय झालं पाहा
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @sureshsinghj नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने म्हंटलं की, “आम्ही तर पोलिसांचं नाव ऐकूनही पळून जायचो” तर आणखी एकानं म्हंटलंय की “आम्ही अजूनही वडिलांना घाबरतो” अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.