Viral Video: लहान मुलं खूप निरागस आणि गोड असतात. त्यांचे अनेक गमतीशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही होत असतात, ज्यात त्यांचे निरागस बोल अनेकांचे मन जिंकून घेतात. आजपर्यंत तुम्ही असे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात लहान मुलांचे गोड भांडण, आपल्या कल्पनाशक्ती पलीकडील त्यांचे प्रश्न, त्यातील निरागसपणा पाहायला मिळाला असेल. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात एक चिमुकला त्याच्या शाळेतील शिक्षकांना असं काहीतरी सांगतोय जे एकून तुम्हालाही हसू येईल.
जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिकवण्याची पद्धत शहरातल्या महागड्या शाळांनाही मागे टाकते. सोशल मीडियामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, ज्यात शाळेतील विद्यार्थी कवितेच्या तालावर नाचताना दिसतात तर कधी लेझीम खेळता खेळता पाढे पाठ करताना दिसतात. शिक्षणाचा भीती न बाळगता अभ्यास कसा करावा हे जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकायला मिळते. आतादेखील जिल्हा परिषदेच्या शाळेतील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, वर्गातील शिक्षक एका गोलू नावाच्या विद्यार्थ्याला सरबत कसे बनवायचे असा प्रश्न विचारतात. यावर गोलू त्याच्या बोबड्या बोलात सरबत बनवण्याची रेसिपी सांगतो. यावेळी तो म्हणतो की, आधी पाणी घ्यायचं, मग त्यात साखर टाकायची, लिंबू पिळायचं आणि हलवायचं, गाळायचं आणि पाहुण्यांना प्यायला द्यायचं आणि शिल्लक राहिल्यावर आपण प्यायचं”, या विद्यार्थ्याने शेवटी म्हटलेले वाक्य ऐकून अनेकांना हसू आलं.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील एका @lahuborate या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास १९ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “संस्कारी गोलू”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “शिल्लक राहिल्यावर आपण प्यायचे… किती निरागस”, तर तिसऱ्याने लिहिलंय की, “बाळ खरं बोललं रे, पाहुण्यांना द्यायचं आणि शिल्लक राहिलेलं आपण घ्यायचं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “गोलू आम्हीपण असंच करतो.”