Funny video: आयुष्यात मित्र खूप महत्त्वाचे असतात, असं म्हटलं जातं. एकीकडे ते आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्या सोबत असतात तर दुसरीकडे मस्ती करण्यातही तितकेच पुढे असतात. काही अगदी बॉडीगार्डप्रमाणे सतत आपल्या आजूबाजूला असतात तर काही लोकांमध्येही आपली मस्करी करण्याची संधी सोडत नाहीत. लग्नात तर मित्र अगदी विचित्र मस्करी करताना दिसतात. अनेकदा य मित्रांचे कारनामे सोशल मीडियावर व्हायरल होतात, असाच एक लग्नातील कारनामा सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

लग्न म्हटलं की गिफ्ट आलंच आणि लग्नात आपण दिलेलं गिफ्ट युनिक आणि हटके असावं असा प्रयत्न काही जणांचा असतो. विशेषतः नवरा-नवरीचे मित्रमैत्रिणी तर त्यांना इतके विचित्र गिफ्ट देतात ज्याचा आपण विचारही करू शकत नाही. यात नवरदेवाच्या मित्रांनी नवरी-नवरदेवासोबत लग्नाच्या स्टेजवरच विचित्र मस्करी केल्याचं पाहायला मिळतं. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. आपल्याकडे आजकाल लग्नात गिफ्ट देणं, ही जणू एक परंपराच बनली आहे आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीतरी वेगळं करण्याच्या प्रयत्नात असतात. कधी कपलला सुट्टे पैसे दिल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी अतिशय महागडं गिफ्ट दिल्याचा व्हिडिओ समोर येतो. मात्र आज जो व्हिडिओ समोर आला आहे, तो अतिशय वेगळा आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाहीये.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की नवरी आणि नवरदेव स्टेजवर उभा आहेत. इतक्यात तिथे नवरदेवाचे मित्र येतात. आणि नवरदेवाच्या दिशेने येतात तेवढ्यात नवरदेव त्यांना अडवतो आणि नको नको म्हणतो कारण मित्रांनी काय गिफ्ट आणलंय हे त्याला कळलेलं असतं. आता तुम्ही म्हणाल असं काय गिफ्ट दिलं? तर या मित्रांनी नवरदेवाला चक्क दारुची बाटली गिफ्ट केली आहे. हे पाहून नवरीही अवाक् झाली तर नवरदेवाचे मित्र मात्र हसताना दिसत आहेत. यावेळी नवरदेवाच्या मित्रांनी सोबत फोटो काढले आणि गेले.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: आयुष्यात एका सेंकदाची किंमत काय? ऑक्सिजन सिलेंडरचा भयंकर स्फोट; मात्र एका पाऊलानं तरुण कसा बचावला पाहाच

हा व्हिडीओ सोशल मीडियावर sachinbhangremusic नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर कमेंट करून लोक नवरदेवाची मस्करी करत आहेत. एकानं म्हटंलय, “अशा मित्रांना लग्नातच बोलवायचं नाही.” तर आणखी एकानं “नवरदेवानेही याच्या लग्नात अशीच मस्करी केली असेल म्हणूनच मित्र बदला घेत आहेत.” यासोबत इतरही अनेकांनी यावर मजेशीर कमेंट केल्या आहेत.

Story img Loader