सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेचजण प्रसिद्धीस येऊ लागले आहेत. इन्स्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लोकप्रिय होण्यासाठी लाखो वापरकर्ते दररोज रील अपलोड करत असतात. पण काहीवेळा त्यांच्या एखाद्या कृतीमुळे ते चर्चेचा विषय बनतात. तर काहीवेळा त्यांच्या कृतीमुळे हसू देखील येते. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यात मुलगी रील बनवत असताना बाजूला उभी असणाऱ्या गायीला तिचा राग येतो आणि त्यानंतर जे झाले ते पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. त्यासाठी तुम्ही देखील हा व्हिडीओ एकदा पहाच

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी रील बनवताना दिसत आहे. तिच्या बाजूला एक गायही उभी आहे. मुलगी जेव्हा नाचण्याचा प्रयत्न करते तेव्हा गाय भडकते. यानंतर गाय जे काही करते ते पाहून तुम्हाही पोट धरून हसायला लागाल. कॅमेऱ्याकडे पोज दिल्यानंतर लगेच गाय भडकते आणि तिच्याकडे धावते, असे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

( हे ही वाचा: आधी आपटून आपटून मारले मग गिळले, मगरीने माशाची केली थरकाप उडवणारी शिकार; पहा VIRAL VIDEO)

येथे व्हिडिओ पहा

( हे ही वाचा: तब्बल ७० वर्षांनी भारतात पाहायला मिळणार चित्ता; PM मोदींना वाढदिवशी मिळणार ग्रेट भेट)

हा व्हिडीओ शिवानीगिरी_ नावाच्या युजरने ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि तो सर्वांना हसवणारा देखील आहे. आतापर्यंत ४२ हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केले आहे. त्याच अनेकांनी यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

Story img Loader