Viral video: सध्या देशभरात लग्नाचा सीझन सुरू आहे. अशात सोशल मीडियावर लग्नसमारंभातील नवनवीन व्हिडिओ दररोज पाहायला मिळतात. यातील काही व्हिडिओ अतिशय मजेशीर असतात तर काही व्हिडिओ हैराण करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला हसूही येईल आणि तुम्ही थक्कही व्हाल. कारण यात नवरदेव लग्नाच्या स्टेजवरच असं काही करताना दिसतो, जे आश्चर्यचकित करणारं आहे. आजकाल लोकांना मोबाईलचं जणू व्यसनच लागलं आहे. बहुतेकांच्या हातामध्ये सतत आपला मोबाईल असतो. याचा परिणाम म्हणजे अनेकांना तर याचीही जाणीव राहात नाही की आपण नेमकं कुठे आहे आणि हे लोक कुठेही आपला मोबाईल हातात घेऊन त्यात काहीतरी करू लागतात. सध्या अशाच एका नवरदेवाचा व्हिडिओ समोर आला आहे.नवरदेव स्वत:च्याच लग्नात भर मांडवात मोबाईलमध्ये काय बघतोय पाहा, हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.
आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, हा नवरदेव स्वत:च्याच लग्नात एवढं काय मोबाईलमध्ये बघतोय? तर हा नवरदेव आपल्या मोबाईलमध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग करताना दिसतो आहे. सध्याच्या काळात महागाईमुळे आपले उत्पन्न कसे वाढेल याकडे सर्वांचेच लक्ष आहे. त्यातून अनेक लोकं हे ट्रे़डिंग करताना दिसतात. शेअर मार्केट ट्रेडिंगही अनेक जणं घरबसल्या, ऑफिस झाल्यानंतर करतात. नफा कमावण्यासाठी अल्प कालावधीत स्टॉक, बाँड, कमोडिटीज, डेरिव्हेटिव्ह किंवा चलने खरेदी आणि विक्रीचा संदर्भ देणाऱ्या ट्रेडिंगकडे अलीकडच्या काळात तरूणाईचाही कल वाढतो आहे.
आजकाल मोठ्या प्रमाणात लोक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना अनेक जोखीम देखील हाताळाव्या लागतात. खोट्या ट्रेडिंग अॅप्सच्या माध्यमातून शेअर मार्केटमध्ये मोठा घोटाळा होत असल्याचीही प्रकरणं समोर येत असतात. त्यामुळे सावधगिरी बाळगली पाहिजे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >>नवऱ्याचं लफडं बायकोनं पकडलं! दुसरं लग्न करताना अचानक समोर आली अन्; खतरनाक VIDEO व्हायरल
सोशल मीडियावर हा व्हिडीओ tradingleo.in नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावेळी हा व्हिडीओ १ कोटी लोकांनी पहिला आहे. त्यामुळे या व्हिडीओची चांगलीच चर्चा आहे. एकानं म्हंटलंय, “हे फक्त खऱ्या ट्रेडींग करणाऱ्यालाच समजू शकेल.” दुसरा म्हणतो, “लग्नाचा खर्च काढण्यासाठी नवरदेव तयारी करतोय” तर आणखी एका व्यक्तीने लिहलंय की, “शेअर मार्केट जोडीदारापेक्षा महत्त्वाचे आहे का?”