Funny video: स्त्रीया कितीही पुढे जाऊद्यात, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करुद्यात पण महिलांना घर काही सुटत नाही हे खरंच. त्यात गृहिणींना जरी आपण घरीच तर असतेस तुला काय काम असतं असं सहज बोलत असलो तरी संपूर्ण घरं सांभाळणं म्हणजे खायची गोष्ट नाही. गृहिणींना त्यांचं घर, घरातली काम ही अगदी परफेक्ट लागतात. कधी एकदाची घरातली काम होतात याच्या मागे महिला सकाळपासूनच असतात. दरम्यान वह स्त्री है वो कुछ भी कर सकती है हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल पण त्याचंच एक उदाहरण दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल एवढं नक्की.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक महिला चक्क भर रस्त्यात असलेल्या कारंजाच्या पाण्याने कपडे धुवत आहे. साधारणत: आपण घरातील बाथरुममध्ये कपडे घुतो किंवा चाळीत असू तर अंगणात कपडे धुतो. आणि जर का गावी असून तर मग नदीच्या वाहत्या पाण्यात किंवा विहरीवर महिला कपडे धुतात. मात्र या महिलेने तर कमालच केली. या महिलेने रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या एका कारंजाच्या पाण्यात कपडे धुवायला सुरुवात केली.

VIDEO बघून पोट धरुन हसाल

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बादली आहे आणि या बादलीमध्ये कपडे आहेत. ही महिला हे कपडे कारंजाच्या पाण्यात बुडवून बाहेर काढून पिळत आहे, तर कधी कपडे धुताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर आजूबाजूला अनेक गाड्यांची ये-जा सुद्धा सुरु आहे. मात्र ही महिला कशाचीही चिंता न करता आपलं आपलं काम करत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Shocking VIDEO: त्या जीवाची चूक काय? सायकल चालवताना विद्युत तारेला स्पर्श; १० वर्षाचा मुलगा जागीच ठार

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरील marathi_comedy_katttaया अकाउटवर शेअर करण्यात आलेला आहे. या व्हिडीओवर नेटकरी भरभरुन आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलं आहे की, “चापट आहे ती तिथल्या नेत्यांना कारण रस्त्यावर देखाव्या साठी पाणी पण लोकांचा घरात वापरायला नाही म्हणून ही वेळ आली आहे.” तर आणखी एकानं प्रतिक्रिया देत “वह स्त्री है वो कुछ भी कर सकती है” असं म्हंटलंय तर काहींनी या व्हिडीओवर हसायचे इमोजी वापरत प्रतिक्रिया दिली आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करुन नक्की सांगा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video is going viral on social media in which a women washes her clothes in a street fountain watch video srk
Show comments