Mumbai local viral video: मुंबई लोकलमधून रोज लाखो मुंबईकर प्रवास करत असतात. गर्दीत प्रवास करत घर ते ऑफिस अन् ऑफिस ते घर गाठत असतात. सध्याच्या काळात मुंबईकरांना प्रवासासाठी लोकलचा वापर करणं अत्यंत सुलभ आणि सोपं मानलं जातं. शहराच्या कोणत्याही भागात जाण्यासाठी मुंबईकर प्राधान्याने लोकल रेल्वेचा वापर करतात. परंतु, रेल्वेतून प्रवास करत असताना अनेक लोक डान्स, कला, रील्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ शूट करणं पसंत करत असतात. सोशल मीडियावर असे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही होत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये काही तरुण-तरुणींनी लोकलमध्ये अशी ही बनवा बनवी चित्रपटातील कुणीतरी येणार येणार गं या गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, काही मित्र-मैत्रिणींचा एक गट लोकल ट्रेनमधून प्रवास करत असतात. मात्र, त्यानंतर त्यांनी त्यांच्यातील एका तरुणाला गरोदर महिलेसारखा अभिनय करण्यास सांगितला आणि मग त्यांच्या गटातील तरुणी ‘बनवा-बनवी” या प्रसिद्ध गाण्यावर डान्स करु लागल्या. तरुण-तरुणींचा गंमतीदार अभिनय आणि त्यावर धम्माकेदार डान्स, असे सर्व पाहून अन्य प्रवाशांनाही हसू अनावर झाले आहे.

काही चित्रपटांची जादू ही वर्षानुवर्षे कायम असते. २३ सप्टेंबर १९८८ रोजी मराठी सिनेसृष्टीच्या इतिहासात एक सोनेरी पान जोडले गेले. याच दिवशी राज्यात सर्वत्र ‘अशी ही बनवाबनवी’ हा सिनेमा प्रदर्शित झाला. याला एवढी र्वष उलटली तरी या सिनेमाची जादू आजही कमी झालेली दिसत नाही. या सिनेमातील संवादांवरून आजही मिम्स बनवले जातात.मराठी माणूस मग तो सामान्य व्यक्ती असो वा जागतिक कीर्तीचा क्रिकेटमधील देव भारतरत्न सचिन तेंडुलकर असो ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपट या सर्वाच्या आवडीचा, जिव्हाळ्याचा विषय आहे. या सिनेमांतील संवाद, गाणी अनेकांना तोंडपाठ आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ iamgautamivalam नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.