Wedding video: लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास, महत्त्वाचा असा क्षण असतो आणि हा क्षण फक्त नवरा-नवरीच नव्हे तर सर्वांच्या कायम लक्षात राहावा यासाठी प्रयत्न केले जातात. लग्नसराईला सुरुवात झाली आहे. लग्नसोहळा म्हटलं की लग्नात बरीच तयारी करावी लागते. त्यात वधूसाठी सर्वात मोठी गोष्ट असते ती म्हणजे तिचा मेकअप. जर मेकअप सुंदर असेल तर लग्नाच्या दिवशी नववधू एखाद्या अप्सरापेक्षा कमी दिसत नाही. अशावेळी नववधूने लग्नाआधी मेकअप आणि ड्रेसची तयारी करणं गरजेचं आहे.

लग्न सोहळ्याच्या गडबडीत अनेकदा लग्नाआधी नववधूकडून काही चुका होतात, ज्यामुळे ऐन लग्नाच्या दिवशी मोठा घोळ होऊ शकतो. असंच एक नवरीसोबत झालं, तिनं सगळी तयारी केली, मेकअप, साडी, दागीणे सगळं सगळं पण तरीही शेवटी काहीतरी राहिलंच. मात्र याच एका छोट्याशा गोष्टीसाठी नवरी बाईनं सप्तपदी थांबवल्या. असं काय घडलं हे तुम्हीच पाहा, व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

video of marathi ukhane
Video : “…राव आहे अजय देवगण तर मी आहे रविना टंडन” विदर्भातील महिलांनी घेतले भन्नाट उखाणे
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
a child girl amazing lavani dance
Video : चिमुकलीने सादर केली अप्रतिम लावणी, चेहऱ्यावरील हावभाव पाहून क्षणभरासाठीही नजर हटणार नाही; व्हिडीओ होतोय व्हायरल
Video Shows Father And Daughter love
VIDEO: वडिलांजवळ ढसाढसा रडली नवरी, तर दुसरीकडे बाबांच्या कुशीत खेळतेय चिमुकली; बघता क्षणी डोळ्यात पाणी आणेल ‘हा’ क्षण
young bachelors planning to make chicken
Video : चिकनचा बेत आखला अन् ऐनवेळी गॅस गेला, तरुणांनी केला भन्नाट असा जुगाड
How To Make Roti Quickly Desi Jugaad Video Viral on social media
आळशी सुनेचा अजब जुगाड! सासूने चपाती बनवायला सांगितल्यावर असं काही केलं की ९ कोटी लोकांनी पाहिला हा Video
video of Punekar young guy
Video : असा उखाणा कधीच ऐकला नसेल! पुणेकर तरुणाने घेतला जबरदस्त उखाणा, व्हिडीओ पाहून कोणीही कॉपी करेन
viral video unhealthy vegetables flower selling in market with chemical shocking video goes viral on social media
आता तर हद्दच पार केली! महिलांनो ‘हा’ VIDEO पाहिला तर यापुढे भाजी घेताना शंभर वेळा विचार कराल

एका नवरीने पायाला नेल पॉलिश लावायची राहिली म्हणून चक्क आपली सप्तपदी थांबवलीय. हो तुम्ही बरोबर ऐकत आहात, हौसेला मोल नाही म्हणतात ते हेच. आपली हौस होण्यासाठी काहीही करायला असतात लोक हे त्यातलंच एक उदाहरण. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भर मंडपात सप्तपदी सुरु होणार तितक्यात नवरीच्या लक्षात येत की पायांच्या बोटाला तिनं नेल पॉलिश लावलं नाहीये. यावेळी ती भटजींना सप्तपदी थांबवण्यास सांगते आणि मैत्रीणीला नेलपॉलिश लावायला सांगते. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरीची मैत्रीण तिला नेल पॉलिश लावताना दिसत आहे, तर नवरदेव हसतोय.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >>VIDEO: पप्पांच्या परीचा नाद नाय! तरूण आणि तरूणीमध्ये रंगली अनोखी स्लो बाइक रेसिंग; बघा कुणी मारली बाजी

सोशल मीडियावर हा व्हिडीओ makeup_artist_durgesha नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “एवढी काय गरजेची होती सप्तपदी चालू असताना” तर आणखी एकानं कमेंट केलीय की, “लग्न चांगलंच लक्षात राहील”

Story img Loader