Viral video: ज्येष्ठ कवी दिवंगत मंगेश पाडगावकर म्हणायचे प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सेम असतं. हो, प्रेम कधी कुठे कोणासोबत होईल यांचं काही नेम नाही. तसंच प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी वयाची मर्यादा नसते. प्रेम बॉलिवूडमधील कलाकारांचे असो किंवा सर्वसामान्यांचे प्रेम हे प्रेम असतं. ती एक खूप सुंदर भावना आहे. सोशल मीडियावर आपण दररोज अनेक व्हिडीओ पाहतो ज्यात कपल आपल्या प्रेमाच्या भावना व्यक्त करतात. तर या सोशल मीडियावर आजी-आजोबांचेही अनेक रोमँटिक व्हिडीओ आपल्याला पाहिला मिळतात. मात्र बायकोही बायकोच असते तिचा कधी मूड बदलेल सांगता येत नाही त्यामुळे तिच्यापासून सगळे नवरे सांभाळूनच राहतात.सध्या सोशल मीडियावर एका आजी-आजोबांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्या व्हिडिओत आजोबा आजींचा मार खाण्यापासून थोडक्यात बचावले आहे.

जिथे प्रेम आहे, तिथे रुसवे – फुगवे, मानवणे या गोष्टी येतातच नात्यात पार्टनर आपल्यावर रुसतो, फुगतो, रागावतो. पण अशावेळी त्यांना मनवणे आपल्याला कठीण जाते . जोडीदाराची नाराजी राग दूर करणं गरजेचं आहे. पण पार्टनरचं रुसवा घालवणं काही सोपं काम नाही. असेच एक आजोबा बायकोचा रुसवा घालवण्यासाठी गेले खरे पण तिथेही त्यांनी तिची मस्करी केली. मग काय बायको अशी भडकली की आजोबाच पळून गेले. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही कळेल बायकोची मस्करी का करु नये?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक आजी घराबाहेर भांडी घासत बसलेल्या आहे. त्याच वेळी आजोबा तिथे येतात आणि आजींच्या पाठीमागे उभं राहून आजींच्या कानात पिपाणी वाजवण्यास सुरुवात करतात. आजी कामात व्यस्त असल्याने आजोबांनी असा त्रास दिल्याने त्या रागवतात. मात्र काही वेळात आजी चिडून आजोबांना मारण्यासाठी उठताना दिसून येतात मात्र आजोबा तिथून पळून जातात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: मरीआई पावली! सूरजचं ते वाक्य खरं ठरलं; बिग बॉसमध्ये जाण्याआधी काय म्हणाला होता एकदा पाहाच

सोशल मीडियावर sangha_3588 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, या वयात सुद्धा बायकोला घाबरावे लागते. पुरुषाने त्याचं दुःख किती लपवावे.. “साधी बायकोची मजाक सुद्धा करू शकत नाही. मावशींनी पातेले उचलल्या उचलल्या बाबा घाबरले.” तर आणखी एकानं “पळा आता, नागीण चिडली” अशी प्रतिक्रिया दिली आहे.