Viral Video : सध्या सगळीकडे आयपीएलची सर्वात जास्त चर्चा सुरू आहे. यंदा आयपीएल २२ मार्चपासून सुरू झाली असून १३ ठिकाणी खेळवली जात आहे. भारतीयांना आयपीएल एखाद्या सणाप्रमाणे वाटते. क्रिकेट हा आवडता खेळ असल्याने अनेक जण आवडीने आयपीएल बघतात. आयपीएलदरम्यान सोशल मीडियावर क्रिकेटचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात.
काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की स्थानिक क्रिकेट सामन्यात काही तरुण मंडळी खेळताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल की बॉलर अनोख्या पद्धतीने बॅट्समनला आउट करतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायल होतोय.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक क्रिकेटचा सामना दिसेल. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की बॅट्समन हातात बॅट घेऊन उभा आहे आणि बॉलर बॉल टाकत आहे. पण बॉल टाकताना तो असं काही करतो की तुम्हालाही हसू येईल. तो अत्यंत हटक्या पद्धतीने बॉलिंग करतो. बॉल टाकण्याची प्रत्येक बॉलरची एक वेगळी शैली असते आणि तो त्या शैली साठी ओळखला जातो. असाच प्रकार या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा तरुण बॉलर जेव्हा विचित्र शैलीत बॉल टाकतो तेव्हा बॅट्समन क्लीन बोल्ड आउट होतो आणि क्षणभर कळत सुद्धा नाही की नेमके काय घडले. बॅट्समन छक्का मारण्याचा प्रयत्न करतो पण बॅट थेट विकेटला लागते आणि विकेट पडते. हा व्हिडीओ पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
marathwada_marathi_news या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “बॉलिंग अशी करा की बॅटर आउटच नाही तर येडा झाला पाहिजे…”
यापूर्वी सुद्धा असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. क्रिकेटमधील मजेशीर बाबी कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. एवढंच काय तर भारतीय क्रिकेट संघाच्या सामन्यादरम्यान सुद्धा अशा अनेक आश्चर्यचकीत करणाऱ्या, थक्क करणाऱ्या तसेच अवाक् करणाऱ्या घटना घडतात.