सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणतातरी लग्नाचा व्हिडिओ व्हायरल होत असतो. यातील मजेदार प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतात. नेटकरीही असे व्हिडिओ आवडीने शेअर करतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही. एका लग्न मंडपात वर वधूची मस्करी करताना दिसत आहे. तेव्हा वधूने केलेली कृती पाहून तुम्हालाही हसू येईल. विवाहाचा विधी सुरु असताना वर मस्करीच्या मूडमध्ये दिसतो. प्लेटमध्ये ठेवलेली मिठाई हातात घेऊन वधुला भरवण्याचा प्रयत्न करतो. ती मिठाई तिला खाण्यासाठी सांगतो. मात्र पाहुण्यामंडळींसमोर वधू मिठाई खाण्यास नकार देते. मात्र इतकं सांगूनही वर काही ऐकत नाही.
वर वधूला मिठाई भरवण्याचा वारंवार प्रयत्न करतो. त्यानंतर वधूला राग अनावर होतो. वराला धडा शिकवण्यासाठी जोरदार चिमटा काढते. त्यानंतर वर इतका जोरात किंचाळतो की मस्करी निघून जाते. त्यानंतर वराच्या चेहऱ्यावर हलकं हसू दिसून येतं.
व्हायरल होत असलेला व्हिडिओ नेमका कुठचा आहे? हे अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना हा व्हिडिओ आवडला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कमेंट्स देत शेअर करत आहेत.