Viral Video : सध्या दिवाळीची सगळीकडे जय्यत तयारी सुरू आहे. लोक खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी करताहेत. घरोघरी लाडू, चिवडा, चकली बनवत आहे. अशात सोशल मीडियावरही दिवाळी संबंधित अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हटके रांगोळी, घरगुती आकाश कंदिल, दिव्यांची सजावट, दिवाळीसाठी खास रेसिपी, दिवाळीत नेसण्यासाठी साड्यांचे प्रकार इत्यादी व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहे.
असाच एक चकलीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये चकलीचे आठ प्रकार सांगितले आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की चकलीचे आठ प्रकार नेमके कोणते? तर हा व्हिडीओ मनोरंजनासाठी बनवलेला आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत चकलीला काय म्हणतात, या आशयाने चकलीचे मजेशीर नावं ठेवली आहेत. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (funny video of Diwali wishes by sharing 8 types of chakli watch viral video)
या व्हिडीओमध्ये चकलीचे आठ प्रकार सांगितले आहे.
व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –
दिवाळी स्पेशल, चकलीचे आठ प्रकार –
१. घाबरलेल्या चकलीला काय म्हणतात – दचकली
२. वाकड्या-तिकड्या चकलीला काय म्हणतात? – लचकली
३.- संपलेल्या चकलीला काय म्हणतात ? गचकली
४. चिडलेल्या चकलीला काय म्हणतात ? – उचकली
५. मध्ये-मध्ये बोलणाऱ्या चकलीला काय म्हणतात? – पचकली
६. दिसून गायब होणाऱ्या चकलीला काय म्हणतात ? – मचकली
७.चुकलेल्या चकलीला काय म्हणतात? – इचकली
८.बिघडलेल्या चकलीला काय म्हणतात ? -बिचकली
त्या खाली व्हिडीओमध्ये लिहिलेय, “तुम्हाला व तुमच्या परिवाराला येणाऱ्या दिपावलीच्या खूप खूप शुभेच्छा”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
dizbuzz या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “दिपावलीच्या शुभेच्छा! चकलीचे प्रकार..”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चपट्या चकलीला पिचकली म्हणतात” तर एका युजरने लिहिलेय, “आता माझी सटकली” काही युजर्सनी तर आणखी चकलीला मजेशीर नावं दिली आहे. कुचकली, मीचकली, बुचूकली, इत्यादी. तर काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.