Drunk Man Viral Video : सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला अगदी मजेशीर वाटतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. या डिजिटल युगात एखादी बाब व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही.

अनेकदा दारूच्या नशेत लोक काहीही करतात. आजूबाजूला काय सुरू आहे याचं भानच त्यांना उरत नाही. मग ते लोकांशी कसंही वागतात कसंही बोलतात. अनेकदा अशा लोकांचे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ज्यात दारूच्या नशेत एका माणसाने जे केलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

दारूच्या नशेत केलं असं काही की…

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून तुम्हाला तमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. या व्हिडीओमध्ये एक माणूस रात्रीच्या वेळी अर्धनग्न अवस्थेत सार्वजनिक ठिकाणी विचित्र प्रकार करताना दिसतोय. त्याचा हा विचित्र प्रकार बघायला खाली अनेकांची गर्दी जमलेली दिसतेय. एका हॉटेलच्या बाल्कनीमधून धावून तो माणूस विजेच्या तारांना लटकत दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जातो. तिथून परत पुढे चालत जात असताना त्याचा पाय घसरतो आणि तो खालीच पडतो. तो माणूस खालीच पडताच क्षणी सगळे लोक त्याच्या दिशेने धावतात. यादरम्यान हा प्रकार नेमका कुठे घडलाय, हे अद्याप कळू शकलं नाही.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ या @news_with_zuber या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला “दारू चढल्यावर माणसावर झाला परिणाम ” अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसंच व्हिडीओ व्हायरल होताच याला ७ लाखांच्यावर व्ह्युज आले आहेत.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “बापरे, त्याला बघायला किती गर्दी जमली आहे” तर दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं, “आताच्या काळातील मोगली.” तर तिसऱ्याने “नशेत लोक काय काय करतात” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “हा तर अगदी स्पायडरमॅन झाला आहे”