दारू पिणं आरोग्यासाठी किती नुकसानकारक असतं हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र तरीही लोक दारू पिणं बंद करत नाहीत. आजकाल तर तरुणांमध्येही दारू पिण्याची जणू स्पर्धाच आहे. सुरुवातीला हे लोक हौस म्हणून दारू पितात मात्र नंतर हीच सवय बनून जाते. पुढे ही सवय सोडणं अशक्य होत जातं. दारूच्या नशेत व्यक्तींच्या हातून घडलेल्या अनेक विनोदांचे व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. असाच एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय.
दारूच्या नशेत लोक अनेकदा असे काही विचित्र आणि उलट सुलट गोष्टी करतात, जे पाहून कधी कधी हसू आवरत नाही. असंच दारूच्या नशेत धुंद झालेल्या या व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती दारूच्या नशेत डोलताना दिसून येत आहे. त्याच्याकडे एक सायकल आहे. तो इतक्या नशेत असतो की अनेक वेळा प्रयत्न करूनही त्याला सायकलवर बसता येत नाही. तो पुन्हा पुन्हा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक प्रयत्नात तो सायकलसह जमिनीवर कोसळतो.
आणखी वाचा : रस्ता आडवायला झोपून घेतलं, मग चालकाने काय केलं यावर विश्वास बसणार नाही, पाहा हा VIRAL VIDEO
काही लोकांनी सायकलवर बसण्याचा प्रयत्न करत असलेल्या या व्यक्तीचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला आणि बघता बघता तो व्हायरल सुद्धा झाला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेळोवेळी रिट्विटही करण्यात आला आहे. अलीकडेच आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी हा व्हिडीओ त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आणि एक मनोरंजक कॅप्शनही लिहिली. त्यांनी लिहिलं होतं की ‘तुन्न…. पगाराचा दिवस, किंवा रोजचं काम किंवा निवडणुकीचा मोसम…” असं विनोदी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : अरे बापरे! जंगल सफारी करताना गाडीसमोर चक्क सिंह आला, मग काय झालं ते तुम्हीच बघा
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : या ‘छोटी दीपिका’ने सोशल मीडियावर घातला धुमाकुळ, एक्स्प्रेशन्स पाहून Ranveer Singh सुद्धा वेडा झाला
यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आला. यासोबतच या व्हिडीओवर अनेक प्रकारच्या कमेंट्सही पाहायला मिळाल्या. या मजेदार व्हिडिओबद्दल लोक सतत त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत होते. मात्र, व्हिडीओमध्ये दिसणारी ही व्यक्ती कोण आहे. याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही.