पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी स्वत: मेट्रोमधून प्रवास करत नागरिकांना प्रवासासाठी मेट्रो खुली करून दिली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रचंड उत्साह दाखवत पहिल्याच दिवशी मेट्रोतून प्रवासासाठी मोठी गर्दी केली. पुण्यातील पाच तर पिंपरी-चिंचवडमधील सात किलोमीटर अंतरात मेट्रोची धाव सुरू झाली. दोन्ही शहरांमध्ये मेट्रो सुरू झाल्याचा आनंद नागरिकांना आहेच आणि ते प्रवासीसंख्येवरूनही दिसून येत आहे. पण या मेट्रो प्रवासातही पुणेरी इंगा काही सुटला नाही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणार नाही. असाच एक व्हिडीओ समोर आला असून यात पुणेरी बाणा दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणेरी अपमान कसा असतो? हे दाखवणारा आजोबांचा व्हिडीओ तुम्ही पहिलाच असेल. आता या पुणेरी आजोबांनंतर एका आईचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अवघ्या १० सेकेंदाच्या या व्हिडीओमध्ये त्या बाईचा मुलगा मेट्रोच्या बाहेर जाऊन फोनवर फोटो काढत असतो. तेवढ्यात मेट्रोचा दरवाजा बंद होऊ लागतो आणि त्याची आई त्याला ओरडत आतमध्ये ये म्हणते. तो आत आल्यावर त्याला फटका मारत ओरडते.

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

(हे ही वाचा: निकोलस पूरनचा झेल पकडण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर दोन खेळाडूंची झाली टक्कर; Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्सदेखील दिल्या आहेत. एका युजर्सने लिहलं आहे की, ‘पुणे दर्शन’. दुसऱ्याने कमेंटमध्ये पुण्याच्या मेट्रोमधला अजून एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.