Funny video: खरं तर बालपण हे खूप सुंदर असते. लहानपणी आपल्याला त्याचे महत्त्व कळत नाही पण मोठे झाल्यावर बालपण हवेहवेसे वाटते. “लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ।” या ओळी तुम्ही अनेकदा ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. अशाच या दोन चिमुकल्या मुलींचा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. आताच्या तारुण्य वयात जरा बालपणात वळून बघितले असता आपण बऱ्याच वर्षाचा काळ लोटून पुढे आलो आहोत असे वाटते. सध्याच्या मुलांचे बालपण बघता हवे तसे बालपण सध्याच्या मुलांना जगायला मिळत नाही किंबहुना बालपण अनुभवयास मिळत नाही असे निदर्शनास येते. काय दिवस ते बालपणातील दिवस विसरू ही शकत नाही. ते बाल्यावस्थेतील जीवन म्हणजे आजही मनावर कोरलेले शिल्प अथवा एक कधीही संपुष्टात न येणारा जबूत खजिनाच जणू. ते दिवस आठवले की पुन्हा एकदा लहान व्हावेसे वाटते. मात्र सध्या समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या बालपणीची आठवण येईल.
आपण सगळेच लहानपणी वेगवेगळे खेळ खेळलो आहोत. त्यात कावळा उड चिमणी उड हा खेळ तर प्रत्येकानं खेळलाय. या दोन चिमुकल्या मुलीही हाच खेळ खेळत होत्या, मात्र यावेळी असं काही झालं की हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. हल्लीची लहान मुलं खूपच हुशार आणि चलाख असतात. अशाच या मुलींचा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन मुली खाली जमिनीवर बसून खेळ खेळत आहेत. यामध्ये पहिली मुलगी कावळा उड, चिमणी उड असं म्हणते आणि मग दोघी जणी बोटं वर करतात.यानंतर पुन्हा ही चिमुकली बैल उड असं म्हणते, यावेळी बोट उचलायचं नाहीये मात्र त्यातल्या दुसऱ्या मुलीला पटकन लक्षात येत नाही आणि ती बोट वर करते. यावेळी तिची मैत्रीण पटकन उठते आणि तिला दम देत म्हणते, बैल उडतो का? आणि यानंतर एकच हशा पिकला. या चिमुकलीची हुशारी पाहून सगळेच अवाक् झाले आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> अजब! ही कंपनी डेटिंग आणि रोमान्स करण्यासाठी कर्मचाऱ्यांना देते भरघोस बोनस; कारण ऐकून व्हाल हैराण
सोशल मीडियावर हा व्हिडीओ marathi.hindi.song82081 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही व्हिडीओ पाहून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.