पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रो प्रकल्पांचं उद्घाटन करण्यात आलं. मोदींनी स्वत: मेट्रोमधून प्रवास करत नागरिकांना प्रवासासाठी मेट्रो खुली करून दिली. यानंतर पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी प्रचंड उत्साह दाखवत पहिल्याच दिवशी मेट्रोतून प्रवासासाठी मोठी गर्दी केली. पण या मेट्रो प्रवासातही पुणेरी इंगा काही सुटला नाही अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. मेट्रोचा शुभारंभ झाल्या झाल्या त्यात एक भांडण झाल या भांडणाचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणेरी आजोबा, पुणेरी आईनंतर आता पुणे मेट्रोतील पहील्या भांडणाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. अवघ्या १५ सेकेंदाच्या या व्हिडीओमध्ये मेट्रोमध्ये दोन बायका भांडताना दिसत आहेत. पोस्ट करणाऱ्या युजरने त्यावर मजेशीर कॅप्शन दिली आहे. ‘ अगदी ताजी आणि पहिली पुणे मेट्रोची लढाई.’

(हे ही वाचा: Pune Metro: पुणेरी आजोबानंतर आता मेट्रोमधील आईचा मजेशीर Video Viral)

(हे ही वाचा: पीव्ही सिंधूचा ‘कच्चा बदाम’ गाण्यावर भन्नाट डान्स, Video Viral)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहे. या व्हिडीओखाली अनेकांनी मजेशीर कमेंट्सदेखील दिल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video of two women arguing in pune metro viral ttg