जगभरात अशी अनेक प्रेमी युगुले आहेत; ज्यांना खास पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करायला आवडते. पण, काही जण हटके पद्धतीने आपले प्रेम व्यक्त करतात. असे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात; ज्यामध्ये प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेमी युगुले कधी अनोख्या, तर कधी विचित्र पद्धतीने प्रेम व्यक्त करीत लोकांचे लक्ष वेधून घेतात. त्यातील काही पद्धती खरोखरच काळजाला भिडणाऱ्या असतात; पण काही पाहूनच मोठ्याने हसायला येते. नुकताच प्रेम प्रकरणासंबंधित असा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जो पाहून तुम्हाला हसू आवरणे अवघड होईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

प्रेयसीच्या रिजार्चमुळे वैतागला प्रियकर

असे म्हणतात ना की, प्रेमात संवाद कधीच संपत नाही. पण काही वेळा एकमेकांपासून दूर असल्यामुळे प्रेमी युगुल मोबाईलवर तासन् तास बोलत आपल्या प्रेमाच्या गोष्टी करत असतात. अशाने मोबाइलचे आलेले बिल पाहून डोक्यावर हात मारण्याची वेळ येते. अलीकडेच सोशल मीडियावर प्रेयसीच्या मोबाइलचे बिल भरून वैतागलेल्या अशाच एका प्रियकराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे; ज्यात त्याने गाण्याच्या माध्यमातून आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. व्हिडीओमध्ये एक पत्र दिसत आहे; ज्यामध्ये त्या व्यक्तीने ‘दिलवाले’ या हिंदी चित्रपटातील ‘जीता था जिसके लिए’ गाण्याच्या ट्युनवर एक हटके गाणे लिहून, ते तो गातोय.

हेही वाचा – ढोलीडा ढोल बाजे…! अमृता फडणवीसांनाही आवरला नाही गरबा खेळण्याचा मोह; Video मुळे पुन्हा आल्या चर्चेत

प्रेयसीच्या मोबाइलचे बिल भरून कर्जबाजारी झाल्याने प्रियकराने गाण्याच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली आहे. व्हिडीओ ऐकल्यानंतर तुम्हाला असेही वाटेल की, ती व्यक्ती कर्जामुळे त्रस्त आहे आणि कर्जदाराला समजावण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, कर्जदार ते समजून घेण्यास तयार नाही. व्हिडीओमध्ये तो माणूस पुढे म्हणतो की, तो त्याच्या प्रेयसीचा मोबाईल रिचार्ज करायचा; ज्यामुळे तो आता आर्थिक अडचणीत सापडला आहे.

हा व्हिडीओ @simplyeedits या इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १७ लाख ५५ हजारांहून अधिक लोकांनी लाइक केले आहे. लाखो वेळा पाहिल्या गेलेल्या या व्हिडीओवर युजर्स कमेंट करून मजा घेत आहेत. एका युजरने लिहिलेय, “तो माझे गाणे का गात आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “आम्हालाही वेदना होत आहेत.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “हा थेट हृदयावर झालेला हल्ला आहे. भाऊ, मी अजून कर्ज फेडू शकलो नाही. तिने मला लुटले.” चौथ्या युजरने लिहिलेय, “तुम्हीही या समस्येतून जात आहात हे पाहून वाईट वाटते.”