करावे तसे भरावे ही म्हणावे ही म्हण आपल्याला इयत्ता ४ थीमध्ये आपण शिकलेली आहे. प्रत्येक व्यक्तीला एक ना एक दिवस कर्माचं फळ मिळतं, असं अनेकदा म्हटलं जातं. माणूस चांगली आणि वाईट दोन्ही कर्म करतो आणि वाईट कर्मांचे परिणाम त्याला भोगावे लागतात. प्रत्येकाला वाईट कर्मांचे परिणाम भोगावे लागतात. कधीकधी लोकांना त्यांच्या वाईट कर्माचं फळ लगेच मिळतं. आता कर्माबाबत इंटरनेटवर अनेक व्हिडीओ आहेत, जे येताच व्हायरल होतात. आता या एपिसोडमध्ये एक मजेदार व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका म्हशीला मारणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कर्माचं फळ लगेच मिळतं. कसं ते पाहा…
एखाद्याला त्रास देणं म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे, असं तुम्ही ऐकलं असेलच. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असंच दृश्य दिसतंय. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, की रस्त्यावर काही व्यक्ती म्हशीची सवारी करत गाडीवर बसलेले आहेत. त्यांची गाडी आणखी वेगात पळवण्यासाठी हे व्यक्ती म्हशीला चाबकाने फटके मारताना दिसून येत आहेत. चाबकाचे फटके पडताच म्हैस सुद्धा वेगाने धावू लागते. इतक्या वेगाने ही म्हैस पळत असून सुद्धा या व्यक्तींचं मन काही भरत नाही. ते पुन्हा या म्हशीला चाबकाचे फटके देतात. त्यानंतर पुढे जे घडतं त्याला ‘कर्माचे फळ’ म्हणतात.
आणखी वाचा : Kala Angoor : ‘कच्चा बादाम’ पाठोपाठ आता ‘काला अंगूर’ गाणं होतंय VIRAL
अनेकदा आपण प्राणी किंवा माणसाचं वाईट चिंतायला अथवा करायला जातो आणि तसाच प्रकार पुन्हा आपल्यासोबत घडतो ज्याला आपण ज्याचं जसं कर्म तसं फळ असं म्हणतो. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर वाईट केल्यावर वाईटच होतं. याचं ताजं उदाहरण या २१ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये आहे. गाडीवरचा चालक लागोपाठ म्हशीला चाबकाचे फटके देत गाडी वेगाने पळवण्यासाठी मारत होता. त्यानंतर ही म्हैस आपला मार्गच बदलून टाकते आणि टर्न घेते. यात या व्यक्तींची गाडी थेट डिव्हायडरला जाऊन आदळते आणि उंच हवेत उडून मग जोरात जमिनीवर आपटतात. गाडीतले लोक सर्व खाली पडले तरी म्हशीने मात्र मागे वळून सुद्धा पाहिलं नाही. या व्यक्तींना त्यांच्या कर्माचे फळ देऊन म्हैस त्याच वेगाने पुढे धावत निघते. गाडीवरील व्यक्ती ज्या पद्धतीने जमिनीवर आपटले, ते पाहून सर्व जण जवळ जवळ एक दोन आठवडे उठू शकणार नाहीत, असा अंदाज दिसतो.
आणखी वाचा : ट्रिपवरून परतलेल्या मालकाला पाहून कुत्र्याने मारली मिठी, VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : लज्जास्पद! भररस्त्यात एका दिव्यांगाला पती-पत्नीकडून काठीने मारहाण
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. @susantananda3 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. ‘कर्मा म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत पाहा’ अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. बघता बघता हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की आतापर्यंत या व्हिडीओला १ लाख ११ हजारांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ६,३२० लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय.
आणखी वाचा : रस्त्यावर भीक मागून आईने मुलासाठी घेतली स्कुटी, चिल्लर भरलेले कॅन घेऊन शोरूम गाठलं, पाहा VIRAL VIDEO
लोक या व्हिडीओचा भरपूर आनंद घेत आहे. तसंच हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक आपली वेगवेगळी मत कमेंट्स सेक्शनमध्ये शेअर करत आहेत. काही युजर्सनी कमेंट करत लिहिलंय की, “कर्माचे फळ ऑन द स्पॉट”. तर दुसऱ्या आणखी एका युजरने लिहिलंय की, ” शिक्षा मिळायला थोडा सुद्धा उशीर झाला नाही”. काही युजर्सनी तर “शेवटी, लोक मुक्या प्राण्यांना चिडवून त्रास का देतात? असा सवाल केलाय. अनेकांनी जैसी करनी वैसी भरनी, या व्यक्तींना चांगलीच अद्दल घडली सारख्या तुफान कमेंट्स केल्या आहेत. अनेक युझर्सनी तर या तरुणाप्रती संताप व्यक्त केला आहे.