Viral Video : सोशल मीडियावर शाळेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर आपल्या शाळेचे जुने दिवस आठवतात. शाळेतील शिक्षक मित्र मैत्रीणींची आठवण येते. हे व्हिडीओ कधी खळखळून हसवतात तर कधी भावुक करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक शिक्षिका विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना दिसत आहे. शिक्षिका विद्यार्थ्यांना त्यांच्या वडिलांविषयी माहिती विचारते तेव्हा विद्यार्थी भन्नाट उत्तरे देतात. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक वर्गखोली दिसेल. व्हिडीओ काही विद्यार्थी दिसत आहे जे शिक्षिकेच्या विचारण्यावरून वडिलांविषयी माहिती सांगताना दिसत आहे.
विद्यार्थी १ – माझ्या पप्पाचं नाव आहे आमीर, माझे पप्पा शाळेला गेलो नाही तर लय हाणतात.
विद्यार्थी २ – पाणी आणतात. अभ्यास पण घेतात
विद्यार्थी ३ – माझे पप्पा अभ्यास घेत नाही
विद्यार्थी ४ – माझे पप्पा अभ्यास घेतात.
विद्यार्थी ५ – माझे पप्पा मोबाईल बघतात
विद्यार्थी ६ -माझे पप्पा खायला आणतात
विद्यार्थी ७ – माझे पप्पा लय हाणताहेत
विद्यार्थी ८ – माझे पप्पा अभ्यास घेतात
विद्यार्थी ९ – माझ्या पप्पाचं नाव सुधीर
विद्यार्थी १० – माझ्या पप्पाचं नाव राम. माझे पप्पा कारखान्यात काम करतात.
विद्यार्थी ११- माझ्या पप्पाचं नाव समाधान. माझे पप्पा नुसता मोबाईलच बघतात.
विद्यार्थी १२- आमचे पप्पा अभ्यास घेतात
विद्यार्थी १३ – माझ्या पप्पाचं नाव नितिन. माझे पप्पा सारखंच मोबाईल बघतात.
अशा प्रकारे सर्व १२-१३ विद्यार्थी त्यांच्या वडिलांविषयी मजेशीर माहिती सांगतात. हा व्हिडीओ पाहून कोणालाही हसू आवरणार नाही.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)
usha.koshti.589 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पप्पांविषयी माहिती सांगतात…” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “समाधानच्या पोराचे सगळे दात पडले पुढचे” तर एका युजरने लिहिलेय, “पप्पा म्हणणे सोडा आणि आता बाबा म्हणायला शिकवा” काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.