Viral video: ऍमेझॉन अलेक्सा हा एक AI व्हॉईस असिस्टंट आहे आणि इंटरनेटच्या मदतीने तुम्ही घरगुती उपकरणे चालवू शकता तसेच तुमच्या अनेक समस्यांचे ते समाधानही देते. विशेषत: ज्या घरांमध्ये लहान मुलं आहे अशा घरांमध्ये हे उपकरण खूप उपयुक्त मानले जाते, कारण त्यांच्या अभ्यासातही खूप मदत होते. तसेच लहान मुलं यासोबत टाईमपास आणि मस्तीही करत असतात. अशाच एका चिमुकलीनं अ‍ॅलेक्सासोबत मस्करी केली आहे, मात्र अ‍ॅलेक्सा एवढी स्मार्ट आहे की अ‍ॅलेक्सानं तिचीच फिरकी घेतलीय. या चिमुकलीनं अ‍ॅलेक्साला अ‍ॅलेक्सा प्लिज शिव्या दे ना.. अशी विनंती केली त्यानंतर अ‍ॅलेक्सानं जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अ‍ॅमेझॉननं बनवलेलं अ‍ॅलेक्सा हे टूल युझर्सना खूप आवडतं. युझर्सना अ‍ॅलेक्सासोबत बोलायला, तसंच ऑर्डर देऊन तिच्याकडून बरीच कामं करून घ्यायला आवडतं. अशाच चिमुकलीनं अ‍ॅलेक्सासोबतच मज्जा केलीय. जगभरामध्ये दिवसोंदिवस तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसत आहे. आपलं काम अधिक सोयीस्कर व्हावं आणि वेळ वाचवण्याच्या उद्देशाने तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. तंत्रज्ञानाच्या वापराने दैनंदिन जीवनावरही मोठा परिणाम होतो. अगदी गुगल असिस्टंट असो, अ‍ॅलेक्सा किंवा आयफोनची सीरी असो या साऱ्या गोष्टी आपल्या दैनंदिन दिवसानाचा भाग झाल्या आहेत. आपण अनेकदा कळत न कळत या गोष्टी इतक्या सहजपणे वापरतो की त्या आपल्या पर्सनल असिस्टंट वाटतात.

शिव्या घालणं हे किती वाईट आहे काही वेगळं सांगायला नको. पण हीच गोष्ट अ‍ॅलेक्सानं वेगवेगळ्या पद्धतीनं त्या मुलीला समजवून देण्याचा प्रयत्न केला. सुरूवातीला अ‍ॅलेक्सा म्हणाली, शिव्या द्यायच्या? तोबा तोबा. मग मुलीनं आणखी विनंती केली. मग अ‍ॅलेक्सा म्हणाली, याबाबतीत मी खूप संस्कारी आहे. पण मुलगी काही ऐकायला तयार नाही. मग अ‍ॅलेक्सा म्हणते शिव्या दिल्या तर शक्तिमान येईल तिनं शक्तिमानची भिती दाखवण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी आपल्या म्हणण्यावर ठाम होती शेवटी अ‍ॅलेक्सानं एक कप गरम चहा पी असा सल्ला तिला दिला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “आयुष्यात फक्त एवढं यशस्वी व्हा” मुलानं वडिलांच्या ६५व्या वाढदिवसाला गिफ्ट केली मर्सिडीज कार; वडिलांची रिअ‍ॅक्शन पाहाच

सोशल मीडियावर हा व्हिडीओ saiquasalwi नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरीही पोट धरुन हसत आहेत तसेच व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत.