माकड हा आपल्या पाहण्यातील अतिशय चंचल आणि चतुर प्राणी आहे. शहराच्या अनेक ठिकाणी माकडांची टोळी आपणाला दिसते. काही माकडं तर एवढी माणसाळलेली असतात की, ते न घाबरता आपल्या हातामध्ये असणारं खायचं सामान घेऊन पळून जातात. ते सामान घेऊन जाताना त्यांच्यातील चपळाई आपणाला दिसून दिसून येते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर अशा अनेक माकडांचे मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहेत. काही व्हिडीओमध्ये माकड घरातील भांडी घासतना दिसत आहेत. तर काही चक्क मोबाईल हाताळताना दिसत आहेत. सध्या एका माकडाचा असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे, तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही.

हेही वाचा- इच्छा तिथे मार्ग! दुकानासाठी जागा नाही म्हणून त्याने केला देसी जुगाड, Viral फोटोवर होतोय कौतुकाचा वर्षाव

या व्हिडीओत, एका दुचाकीवर जाऊन बसलेल्या माकडाला जेव्हा त्याचाच चेहरा त्या गाडीच्या आरशामध्ये दिसतो तेव्हा त्याची उडालेली तारांबळ पाहून तुम्ही देखील हसणार आहात. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका झोपडीत उभ्या केलेल्या दुचाकीवर एक माकड बसलेलं असताना त्याची नजर दुचाकीच्या आरशात जाते आणि याआधी गाडीवर शांतपणे बसलेल्या माकडाला जेव्हा स्वतःचा चेहरा आरशामध्ये दिसतो तेव्हा ते माकड सैरभैर होताना दिसत आहे.

त्यानंतर ते माकड दाताने चक्क काचेला चावण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहे. माकडाच्या या कृतीवरुन त्याला आपलाच चेहरा बघून आरशात दुसरे माकड असल्याचा भास झाल्यामुळे ते त्याच्याशी भांडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचा हाच राग एका व्यक्तीने कॅमेऱ्यात कैद केला आहे. तो व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ‘मैं नही तो कौन बे’ या रॅपसाँगप्रमाणे त्याला दुसरं माकडं आपल्या समोर आल्याचं सहन झालं नाही असं नेटकरी म्हणत आहेत.

हा व्हायरल व्हिडिओ ram_maurya55555 नावाच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. त्याला आतापर्यंत ४ लाख ७४ लोकांनी पाहिला आहे. तर या व्हिडिओला २२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. या व्हिडीओवर अनेक वेगवेगळ्या मजेशीर कमेंट देखील येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Funny video viral on social media seeing himself in the mirror the monkey started a fight jap