Funny Video Viral : दारू पोटात गेली की माणूस काय करू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव हा व्हिडीओ पाहताना येत आहे. मद्यपी लोक कधी काय करतील काही सांगता येत नाही. अशा नशेबाज लोकांना काहीवेळा आपण काय करतोय याचे भान राहत नाही, आपण करतोय ते योग्य आहे की अयोग्य हेही त्यांना समजत नाही. अनेकदा लोक नशेत असे काही कृत्य करतात, ज्याने ते चारचौघांत स्वत:चचं हसं करून घेतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात मद्याच्या नशेत काही तरुण असे काही करतात की, पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत काही तरुण एका बारमधून बाहेर पडत असल्याचे दिसतेय. त्यांची चाल पाहता त्यांनी खूप मद्यप्राषन केले असावे असे वाटते. आपल्याकडे मद्यपान करून गाडी चालवणे कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे आपल्याकडे सहसा लोक ड्रिंक अँड ड्राईव्ह करण्यास घाबरतात. पण व्हिडीओ पाहून दिसतेय की, या लोकांनी हे जरा जास्तच मनावर घेतलं आहे.

Mumbai Local Train Shocking video Womans Obscene Dance
मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Tirupati Stampede Latest Updates| Stampede at Tirupati bairagipatteda token counter
Tirupati Stampede : तिरुपतीच्या चेंगराचेंगरीत कायमची ताटातूट, व्हायरल व्हिडिओमुळे पतीला समजली पत्नीच्या मृत्यूची बातमी
Spotify logo
Spotify : “कर्मचाऱ्यांना मुलांसारखे वागवू शकत नाही”, ‘Work From Anywhere’ वर स्पॉटिफाय ठाम
1.5 lakh Pakistan government jobs
एका झटक्यात गेल्या दीड लाख सरकारी नोकऱ्या; पाकिस्तान अभूतपूर्व संकटात, नेमकं घडतंय तरी काय?
Google Map News Assam police
Assam Police : आसाम पोलीस छापा मारायला निघाले अन् गुगल मॅपमुळे पोहोचले नागालँडला; पुढे घडलं असं काही की सर्वांनाच बसला धक्का
Ration Card
Ration Card : रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘ही’ सेवा झाली बंद; काय होणार परिणाम? वाचा!
Sanjay Raut On Municipal Corporation election
Sanjay Raut : मुंबई महापालिकेची निवडणूक ठाकरे गट स्वबळावर लढणार? संजय राऊतांचं मोठं भाष्य; म्हणाले, “दिल्लीत जे घडलं तेच…”

चार तरुण बारमधून बाहेर पडतात अन्…

व्हिडीओत पुढे तुम्ही पाहू शकता की, चारही तरुण बारमधून बाहेर पडताच एका कारच्या जवळ जातात. पण, कारमध्ये न बसता ती कारच उचलून चालू लागतात. मद्याच्या नशेत तरुणांना इतकी काय ताकद येते की, ते कार उचलून धावत घेऊन जाताना दिसत आहेत, जे पाहून बारमध्ये बसलेले लोकही आश्चर्यचकित होतात, तर अनेक जण हसू लागतात.

मुंबई लोकलमध्ये तरुणीने ओलांडली मर्यादा! अश्लील कृत्य पाहून प्रवासी संतापले; VIDEO व्हायरल

हा मजेशीर व्हिडीओ @MyWishIsUs नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “ह्यांनी डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह खूप गांभीर्याने घेतलं आहे.” दरम्यान, अनेक युजर्सनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, हे जरा जास्तच आहे. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, ही एक मजेशीर घटना आहे. शेवटी एकाने लिहिले की, खरंच ह्यांनी जरा जास्तचं मनावर घेतलेलं दिसतंय.

Story img Loader