कोणत्याही ठिकाणी किंवा व्यक्तीसोबत सेल्फी घेणं आजकाल सामान्य बाब झालीये. लोकांना सेल्फी घेण्याची इतकी सवय लागलीये की हातातली एकही चांगली संधी कोणी सोडत नाही. मग कोणी वृ्दध असो की एखादी महिला किंवा लहान मुलगा, सर्वांनाच सध्या सेल्फीचं ‘याड’ लागलंय. पण, सेल्फीच्या नादात अनेकदा फजिती झाल्याच्या घटनाही घडल्याचं अनेकदा समोर आलंय. असाच हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला हसू आवरता येणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुठे फिरायला गेलो की फोटो काढणं आलंच. बहुतेक पर्यटनस्थळी उंट असतात. त्यामुळे या उंटासोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाही. उंटासोबत पोझ देत किती तरी जण सेल्फी काढताना दिसतात. पण उंट हा तितका भयंकर प्राणी नसला तरी तो खतरनाक ठरू शकतो. व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शेतात उंट उभा असल्याचं दिसत आहे. संपूर्ण मैदान तारांनी वेढलेले आहे. एक महिला तारेजवळ येते, जिथे उंट उभा आहे. यानंतर ती महिला हसते आणि त्याच्यासोबत सेल्फी काढू लागते. महिलेने फोटो क्लिक करताच उंटाने तिच्या डोक्यावर हल्ला केला. त्यानंतर ती महिला खाली कोसळते.

आणखी वाचा : चालत्या ट्रेनमध्ये चढताना तोल गेला अन् अचानक घडला मोठा चमत्कार, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : स्टाईल मारायला गेला आणि तोंडावर आपटला, VIRAL VIDEO पाहून हसू आवरता येणार नाही

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण पोट धरून हसू लागले आहेत. आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘afvofficial’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा मजेदार व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. तसंच १६ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडीओला लाईक केलं आहे आणि त्यावर जोरदार चर्चा करत आहेत. काहीजण म्हणतात की, हा लव्ह बाईट आहे. महिलेसोबत गेम झाल्याचं काहींचं म्हणणं आहे.