Viral video: मुलं देवाघरची फुलं, असं आपण नेहमी म्हणतो. कारण- ती नेहमी खरं बोलतात. सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात लहान मुलांचे व्हिडीओ लोकांना फार आवडतात. त्यांचा निरागसपणा सगळ्यांनाच भावतो. अशाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. सगळीच लहान मुलं अभ्यास न करण्यासाठी नेहमीच टाळाटाळ करीत असतात. मात्र, या चिमुकलीनं अभ्यास न करण्याचं असं कारण सांगितलं की, ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

सोशल मीडियावर कायमच लहान मुलांचे फनी व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हिडीओच्या माध्यमातून त्यांच्यातील निरागसता आपण कायमच अनुभवत असतो सध्या अशाच एका कोल्हापूरी चिमुकलीची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली आहे. रोजरोज अभ्यास करुन कंटाळलेल्या या चिमुकलीने आपल्या शिक्षकांकडे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Sanjay raut on all part mps meeting
Maharashtra Breaking News LIVE Updates : “श्रीमंतांची मुलं चार्टर प्लेननं बँकॉकला…”, तानाजी सावंत यांच्या मुलासंदर्भात संजय राऊतांची खोचक टिप्पणी!
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
revenge resignation workplace trend
‘Revenge Resignation’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतेय याचे प्रमाण?
Viral Video Surat
VIDEO : बीएमडब्ल्यू, मर्सिडीजसारख्या ३० अलिशान गाड्या रस्त्यावर उभ्या केल्या अन्…; शाळकरी मुलांंच्या ‘त्या’ कृत्याने सर्वच हैराण!
Harbhajan Singh Shoaib Akhtar Fight in Dubai Ignites Indo-Pak Rivalry Ahead Of Champions Trophy Video
VIDEO: शोएब अख्तरने हरभजन सिंगला दिला धक्का, भज्जीने उचलली बॅट; IND vs PAK सामन्यापूर्वी भिडले दोन्ही खेळाडू, नेमकं काय झालं?
Gaurav Gogoi on Ranveer Allahbadia
Ranveer Allahbadia: “अशा लोकांना तुम्ही…”, रणवीर अलाहाबादियाचे एकेकाळी कौतुक करणाऱ्या पंतप्रधान मोदींना काँग्रेस खासदाराचा सवाल
interfaith couple legal protection by maharashtra government
आता बिनधास्त करा प्रेमविवाह! ,सरकार देणार ‘सेफ हाऊस’
devendra fadnavis marathi news (1)
“आता तर अशीही चर्चा होईल की मी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटलो आणि…”, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका शाळेतल्या वर्गात अनेक लहान मुलं मुली बसलेले दिसत आहेत. प्रत्येकजण काही ना काही अभ्यास करताना दिसत आहेत. यावेळी वर्गातील एक लहान विद्यार्थी शिक्षकांना सांगतो दार उघडा म्हणजे सूर्यप्रकाश आत येईल मात्र तेवढ्यात एक चिमुकली सांगते नाही ओ सर दरवाजा बंद करा. यावर सर तिला कारण विचारतात..तेव्हा ती म्हणते, सर वरातीत जायचं आहे,उन्ह चेहऱ्यावर पडल्याने मी काळी होईल.चिमुकलीचे हे उत्तर ऐकून प्रत्येकजण हसायला लागतो. यावेळी शिक्षकांनाही हसू अनावर होतं. लहान असो वा मोठ्या मुलींना मेकअपचा खूपच छंद असतो, अशाच एका चिमुकलीला चेहऱ्यावर ऊन पडल्यानं चेहरा काळा पडेल याचं टेन्शन आलं. शेवटी शिक्षिकाही चिमुकलीचं बोलणं एकून हसत आहेत.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ success_907 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर आता नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हटलं, “किती तो निरागसपणा, रम्य ते बालपण”  तर आणखी एकानं “शेवटी मुली त्या मुलीच लहान असो वा मोठ्या” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Story img Loader