Monkye video: माकड हा प्राणी किती खोडकर आहे, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. कधी माकडं रस्त्यावर मस्ती करताना पाहिलं आहे, तर कधी माकडं जंगलात इतर प्राण्यांना त्रास देताना पाहिलं आहे. सद्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दरम्यान माकडं दारू पितात असं कुणी सांगितलं तर विश्वास बसणार आहे कां? पण हे खरं आहे. या धक्कादायक प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेत. व्हायरल होणारा हा व्हिडीओ जंगतील असल्याचे दिसते आहे. या व्हिडीओनंतर अनेक नेटकऱ्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
या व्हिडिओमध्ये एक माकड माणसांप्रमाणेच दारू पिताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, माकड प्लास्टिकचा ग्लास घेऊन बसलं आहे आणि एक व्यक्ती दारूच्या बाटलीतून त्याच्या ग्लासमध्ये दारू ओतत आहे. त्यानंतर माकड एखाद्या दारूड्याप्रमाणे एका दमात संपूर्ण दारू पितं. मद्यपान केल्यानंतर तो पुन्हा ग्लास पुढे सरकवतो, त्यानंतर ती व्यक्ती पुन्हा बाटलीतून दारू त्याच्या ग्लासमध्ये ओतते आणि तो पुन्हा ती पिऊन टाकतो. दोन पेग पिऊन झाल्यावर तो ग्लास तिथे ठेवतो आणि पूर्ण शांत होतो.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – ट्रेनसोबत प्लॅटफॉर्मवर १०० मीटर फरफटत गेली व्यक्ती, थरकाप उडवणारा अपघात CCTV त कैद
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून hasana jaruri hai या अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आह. यावर नेटकरी संमीश्र प्रतिक्रिया देत आहेत.