Viral Video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट मारून लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. मग स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत; मात्र तरीही तरुणाई यातून काहीही बोध घेत नाही. अशाच दोन तरुणांचा धक्कादायक व्हिडीओ सध्या समोर आला आहे; ज्यामध्ये ते चक्क झाडाला दुचाकी बांधून झोका खेळताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल.

हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. लोक काय करतील याचा नेम नाही. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, यामध्ये दोन तरुणांनी झाडाला दुचाकी बांधली आहे. आणि या दुचाकीवर दोघंजण बसून झोका घेत आहेत. या दोन्ही तरुणांना पडण्याची अज्जीबात भीती वाटत नाहीये दोघेही बाईकवर बसून झोक्याचा पुरेपूर आनंद घेताना दिसत आहेत. तोल जाऊन पडण्याचीही शक्यता आहे. मात्र, हा तरुण न घाबरता जोरजोरात झोके घेत आहे. बाईकचं वजन त्यावर दोन तरुणांचं वजन यामध्ये झाडाची फांदी तुटण्याची शक्यता आहे. एवढंच नाहीतर त्यामुळे दुखापतही होण्याची शक्यता आहे. मात्र तरीही तरुण काही एकत नाहीये.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: बसचा धक्का लागला अन् ‘ती’ स्कुटीसकट चाकाखाली सापडली; इंजिनीअरिंगच्या विद्यार्थिनीचा मृत्यू

अनेक महाभाग प्रसिद्धीसाठी स्वतःचा जीवदेखील धोक्यात टाकतात. त्यापैकी काही जण आपल्या स्टंटमध्ये सफल होतात; तर काहींना जन्माची अद्दल घडते. motor_forte_br नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. वारंवार अपघातांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात; मात्र तरीही तरुणाई यातून धडा घेताना दिसत नाही हेच खरं. नेटकऱ्यांनीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने म्हंटलंय “हे सगळं केवळं प्रसिद्धीसाठी आहे”, तर दुसऱ्या युजरने “ती गावची मुलं आहेत ती अशीत बिनधास्त असतात” अशी कमेंट केली आहे.

Story img Loader