Funny Video Viral : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. ट्विटर, इन्स्टाग्राम, यूट्यूबवर रोज अनेक व्हिडीओ अपलोड केले जातात, त्यातील काही फार धक्कादायक असतात, पण काही मोजकेच व्हिडीओ असे असतात जे पाहून अनेकदा हसू आवरणे कठीण होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीदेखील पोट धरून हसाल. कारण या व्हिडीओत एक काकू चक्क काकांच्या डोक्यावर पोळ्या लाटताना दिसत आहेत.

हा मजेशीर व्हिडीओ स्वत: उद्योगपती हर्ष गोयंका यांनी त्यांच्या सोशल मीडियावरील एक्स अकाउंटवर पोस्ट केला आहे, जो आता अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. या व्हिडीओत महिला ज्या पद्धतीने पोळ्या लाटतेय ते पाहून तुम्हीदेखील अवाक् व्हाल. मात्र, हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

ट्रेनमध्ये जेवण विकत घेताय? मग ‘हा’ धडकी भरवणारा Photo एकदा पाहाच; खाताना १००० वेळा कराल विचार

व्हायरल व्हिडीओत तु्म्ही पाहू शकता की, एक काका-काकू स्वयंपाक करताना दिसत आहेत. यात विशेष म्हणजे काकू चक्क काकांच्या डोक्यावर पीठ थापून पोळ्या लाटत आहेत. काका पिठाचे चपटे गोळे करून देत आहेत, त्यानंतर काकू त्यांच्या डोक्यावर पीठ टाकून एकदम परफेक्ट पोळ्या लाटत आहेत. काकींची ही स्टाईल सगळ्यांना फारच विचित्र वाटत आहे.

VIDEO: रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही अनेकांना वडिलांच्या आठवणीने अश्रू अनावर; लोक म्हणाले, “जगात निस्वार्थी प्रेम…”

हा व्हिडीओ प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी @hvgoenka या अकाउंटवरून पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुमचे जेवण तयार होत आहे, याबरोबर हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. अनेकांनी यावर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘हा जुगाड आता भारताबाहेर जायला नको’, दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘नवऱ्याचा चांगला उपयोग केला हिने’ आणि एकाने लिहिले की, ‘महिलांचं डोकं अशा गोष्टीत जास्त चालतं.’