Viral Photo: भारतात ट्रक आणि त्यामागील स्लोगन लय हिट हायत भाऊ. ‘मेरा भारत महान’ तर जवळजवळ प्रत्येक ट्रकच्या मागे लिहिलेलंच असतं. याशिवाय काही ट्रकवाल्यांच्या आत लपलेली कला याच ठिकाणी दिसून येते. जसं की ‘जरा कम पी मेरी रानी, बहुत महंगा हें इराक का पानी’. दुसऱ्यांवर आपल्या गाडीचा प्रभाव पाडण्यासाठी असो किंवा आवड म्हणून पण ट्रकच्या मागे अशी वाक्य लिहिणे हा एक कायमचा ट्रेंड झाला आहे.

रस्त्यावरील प्रवासादरम्यान आपल्या बहुतेक वेळा ट्रक, टेम्पो दिसत असतात. हायवेवर धावणाऱ्या ट्रकची एक वेगळीच स्टाइल असते. मग ते त्यांचे म्युझिकल हॉर्न असोत किंवा त्यांच्या मागे लिहिलेले काही डायलॉग्स किंवा शायरी असो. रोड ट्रिपदरम्यान याची मजा काही औरच असते. दरम्यान एका ट्रकच्या मागची अशीच एक पाटी व्हायरल होत आहे जी पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
lightening strike on front of man while he shooting in mobile shocking video goes viral on social media
मरण इतक्या जवळून कधी पाहिलंय का? घराच्या बाहेर येताच घडलं भयंकर; हृदय कमकूवत असेल तर हा VIDEO पाहूच नका
Evil! Man Brutally Beats Girlfriend After Smashing Her To The Ground At Crowded Petrol Pump In UP's Ghaziabad
याला प्रेम म्हणायचं का? तरुणानं गर्लफ्रेंडबरोबर भरदिवसा काय केलं पाहा; VIDEO पाहून व्हाल सुन्न
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
Terrifying video shows skydiving instructor jumping off cliff before falling to death shocking video
VIDEO: मृत्यू कसा जाळ्यात ओढतो पाहा; स्कायडायव्हिंगवेळी प्रशिक्षकाचा तोल गेला, २० वर्षांचा अनुभव असतानाही नेमकं काय घडलं?
Shocking video taking a selfie with a running train puts a boy in danger shocking video
“बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO
Viral shocking accident while overtaking The Car Fell From The Bridge While Overtaking Accident Video
अंगावर काटा आणणारा अपघात, पुलावरून कार थेट खाली कोसळली; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कुणाची?

हा फोटो पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. भारतभर असे स्लोगन पाहायला मिळतात. यातीलच आणखी एक डायलॉग सध्या व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, या ट्रकच्या मागे लिहलं आहे की, रस्त्यावर गाडी चालवत असताना सतर्क आणि एकाग्र राहणं फार गरजेचं असतं. तुमची छोटीशी चूक तुमच्या जीवावर बेतू शकते. हे समजावून सांगण्यात एका ट्रकमागे काही ओळी लिहिल्या आहेत. मात्र, हा मेसेज इतका गमतीदार आहे की, लोक तो वाचून पोटधरून हसत आहेत. ट्रकच्या मागे लिहिलं आहे की, “वाहन चलाते समय सौंदर्य दर्शन न करें, वरना देव दर्शन हो सकते हैं.” दुसरीकडे लिहिलंय की, “सावधानी हटी सब्जी पूरी बटी.” वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते. तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडत असतात. याच पार्श्वभूमीवर ट्रक मालकानं ही सूचना लिहली आहे असं दिसतं.

पाहा फोटो

हेही वाचा >> PHOTO: पुणेकरांचा विषयच हार्ड! उधारी बंद ठेवण्यासाठी दुकान मालकानं सांगितली भन्नाट कारणं; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

इन्स्टाग्रामवर आतापर्यंत या व्हिडिओला ३९ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर चार लाखांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडीओ लाइक केला आहे. तर ५.७ लाख लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.  अनेक लोक त्यावर कमेंटही करत आहेत.

Story img Loader