सोशल मीडियावर लग्न समारंभाशी संबंधित अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये कधी वधु-वराने केलेल्या भन्नाट डान्सच्या व्हिडीओचा समावेश असतो, तर कधी वधु-वराच्या मित्रांनी केलेल्या मजेशीर डान्सचा. लग्न म्हटलं की बॅंड, डिजे, लग्नपत्रिका, फोटोशूट अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. शिवाय लग्नाच्या गडबडीत काहींना काही चूक होतच असते. कधीकधी ही चूक अतिशय गमतीशीर असते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका लग्नपत्रिकेचा फोटो व्हायरल होत आहे. या पत्रिकेतील मजकूर वाचल्यानंतर अनेकांना आपलं हसू आवरण कठीण झालं आहे. तर ही पत्रिका पाहिल्यानंतर लोक एवढे का हसत आहेत ते जाणून घेऊया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या लग्नपत्रिकेतील एका छोट्याशा चुकीमुळे अर्थाचा अनर्थ झाला आहे. ज्यामुळे ही लग्नपत्रिका वाचणारे, ‘आपणाला लग्नासाठी बोलवलं आहे की, येऊ नका असं सांगितलं आहे.’ या विचारात पडले आहेत. हो कारण या लग्नपत्रिकेत ‘तुम्ही लग्नाला यायचं विसरुन जा.’ असा मजकूर छापल्याचं पाहायला मिळत आहे. खरं तर कोणीही ‘लग्नाला येऊ नका’ असं आपल्या लग्नपत्रिकेत लिहिणार नाही हे सर्वांना माहिती आहे. पण कधीकधी चूकून अशा गोष्टी छापल्या जातात आणि अशा चुकींची चर्चा मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होत असते.

हेही पाहा- मोबाईल पाहण्यात पोलीस व्यस्त; शेजारी बसलेल्या गुन्हेगारावर नाही लक्ष; IPS अधिकाऱ्याने शेअर केलेला फोटो पाहून व्हाल थक्क

व्हायरल फोटो –

व्हायरल होत असलेली लग्नपत्रिका खरी आहे की फोटोशॉप आहे, याबाबतची ठोस माहिती मिळालेली नाही. खरंतर लग्नपत्रिका म्हणजे लोकांना आमंत्रण देण्यासाठीच असते, पण अनेकदा काहीतरी वेगळा मजकूर लिहिण्याच्या नादात अर्थाचा अनर्थ होतो. व्हायरल लग्नपत्रिकेच्या फोटोमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे. या पत्रिकेमध्ये, ‘भेज रहा हूं स्नेह निमंत्रण, प्रियवर तुम्हें बुलाने को, हे मानस के राजहंस, तुम भूल जाना आने को’. असा हिंदीत मजकूर लिहिण्यात आला आहे. ज्याचा अर्थ तुम्ही लग्नाला यायचं विसरुन जा, असा होत आहे. त्यामुळे लग्नपत्रिकेतील या एका छोट्याशा चुकीमुळे हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही पाही- पिटबुलने शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रायव्हेट पार्टचा घेतला चावा, संतप्त नागरिकांच्या मारहाणीत कुत्रा…

ही व्हायरल लग्नपत्रिका ‘जोक्स हाय जोक्स’ नावाच्या फेसबुक अकाउंटवर शेअर करण्यात आली आहे. जी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तर नेहमीप्रमाणे नेटकऱ्यांनी या व्हायरल फोटोवर वेगेवगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिल आहे की, हा पाहु्ण्यांचा खूप मोठा अपमान आहे.’ तर आणखी एकाने, ‘लग्नपत्रिका छापणाऱ्याने आपल्या मनातील भावना पत्रिकेत लिहिल्याचं म्हटलं आहे.