Funny Wedding Video : सध्या सोशल मीडियावर साखरपुड्यापासून ते लग्नापर्यंत अनेक व्हिडीओ ट्रेंड होताना दिसतायत. सध्या एका लग्नसमारंभाचा असाच एक व्हिडीओ चर्चेचा विषय ठरला आहे. हा व्हिडीओ एका लग्नसमारंभातील असून त्यातील नवरा-नवरीच्या कृतीमुळे सर्वच जण अवाक् झाले आहेत. लग्नात शक्यतो नवरा-नवरी दोघेही मान खाली वाकवून एकमेकांना वरमाला घालताना दिसतात. काहीवेळा वरमाला घालताना नवरा-नवरीला वर उचलून घेतले जाते. पण, व्हायरल व्हिडीओत नवरा-नवरीचा वरमाला घालण्याचा एक अनोखा आणि तितकाच भन्नाट प्रकार पाहायला मिळतोय, जो पाहताना तुम्हालाही भारी मज्जा येईल. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लग्नात वरमाला घालण्याच्या अनोख्या पद्धतीचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे, ज्यामधील वरमाला घालण्याची पद्धत तुम्हीपण पहिल्यांदाच पाहिली असेल.

हर्ष गोयंका तुम्हाला माहीतच असतील. हर्ष गोयंका हे भारतातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत, ज्यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवर एका लग्नसमारंभातील अनोखा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरा-नवरी हातात वरमाला घेऊन उभे आहेत, यावेळी त्यांच्या आजूबाजूला अनेक वादनकार अगदी ताला-सुरात ढोल, झांझ आणि इतर पारंपरिक वाद्य वाजवत आहेत. या वाद्यांच्या तालावर नवरा-नवरी चक्क हातात वरमाला घेऊन नाचतायत. यावेळी अगदी आनंदाने बेभान होऊन नाचत दोघेही एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातलात. लग्नात वरमाला घालण्याची ही पद्धत क्वचितच तुम्ही कधी पाहिली असेल.

वरमाला घालण्याची ही अनोखी पद्धत हर्ष गोयंकांनाही आवडली

हर्ष गोयंकांनाही लग्नात नवरा-नवरीची एकमेकांना वरमाला घालण्याची ही अनोखी पद्धत आवडली आहे. त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिले की, लग्नात वरमाला घालण्याची ही आत्तापर्यंतची सर्वात मजेशीर पद्धत आहे.

मोहम्मद शमी आणि सानिया मिर्झा अडकले विवाहबंधनात? व्हायरल फोटोंमुळे चर्चांना उधाण; पण सत्य काय? वाचा

हर्ष गोयंका यांनी लग्नसमारंभातील हा मजेशीर व्हिडीओ त्यांच्या @hvgoenka या अधिकृत अकाउंटवर पोस्ट केला आहे, ज्यावर आता लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. काहींना ही अनोखी पद्धत आवडली आहे, तर काहींना हा प्रकार अजिबात आवडलेला नाही. लग्नाचे व्हिडीओ व्हायरल होण्यासाठी लोक हल्ली असे प्रकार करतात असे काहींचे मत आहे, तर काहींनी लोकांनी लग्नाचा बाजार करून ठेवलाय असे म्हटले आहे.

व्हिडीओवर एका युजरने लिहिले की, युद्ध आणि प्रेमात सर्व काही ठीक आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, मला वाटते ते केरळचे आहेत. त्याच वेळी अनेक वापरकर्त्यांनी सांगितले की, लग्नात अशा प्रकारे हार घालणे चुकीचे आहे.

Story img Loader