G20 Hotel Taj Mahal Menu For Guests: 9 आणि 10 सप्टेंबर या दोन दिवसात G20 शिखर परिषद नवी दिल्ली येथे पार पडणार आहे. जगभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे राहण्याची, जेवणाची उत्तम सोय केली आहे. नवी दिल्ली येथील ताज महाल हॉटेलमध्ये या पाहुण्यांच्या भोजनाचे नियोजन करण्यात आले आहे. भारताच्या पाककलेचे दर्शन घडवणारा खास मेन्यू पाहुण्यांना सर्व्ह केला जाणार आहे. याशिवाय काही परदेशी पदार्थांचा सुद्धा मेन्यूमध्ये समावेश करण्यात आला आहे. यंदाचे वर्ष हे भरडधान्यांना समर्पित असल्याने भारतीय पदार्थांच्या मेन्यूमध्ये भरडधान्याचा सुद्धा कल्पकतेने समावेश करण्यात आला आहे. G20 पाहुण्यांसाठी, पाककला ऑपरेशन्सचे संचालक शेफ अरुण सुंदरराज यांच्या नेतृत्वाखाली मेन्यू तयार केलेला आहे.
नाष्टा:
नाचणीची इडली
बाजरीचे पॅनकेक्स
दुपारचे जेवण/ रात्रीचे जेवण:
बाजरी युक्त लॅम्ब सूप (पाया सूप)
कोनफळ, चेरी टोमॅटो, बाजरी आणि मिक्स मेस्क्लुनचे सॅलड
मुर्घ, बदाम आणि राजगिरा कोरमा
बाजरी नर्गिसी कोफ्ता
कॅरॅमल ओनियन जिरा बाजरी पुलाव
डिझर्ट:
तांदूळ- बाजरी मूस (खीर)
ऑरेंज क्विनोआ- बाजरीची खीर
इन रूम प्लॅटर
चोको बॉन बॉन
पिस्ता आणि भोपळ्याच्या बियांचा रोल, काजू कतली, गुलकंदाचे लाडू
नान कटाई कुकीज
ओट्स चॉकलेट ग्रॅनोला बार
G20 थीम मॅकरून
याशिवाय पाहुणे जर मचान येथे जेवायला प्राधान्य देत असतील तर, ते ऑल-टाइम हिट थाळी निवडू शकतात, ज्यामध्ये खालील पदार्थांचा समावेश असेल.
अवधी मुर्ग कोरमा
भुना घोष
नारळ पायसम
मालवणी कोळंबी
हैदराबाद गोश्त बिर्याणी
मलाई कोफ्ता
बटाटा वारूवाल
हे ही वाचा<< “मला भारताचा जावई म्हणून…”, ऋषि सुनक यांनी सांगितलं G20 साठी येण्याचं खास कारण; म्हणाले, “एकट्याने..”
दरम्यान, जी २० परिषदेसाठी ताज महाल हॉटेलचे रूप सुद्धा भारतीय थीमच्या मंडपासारखे पालटण्यात आले आहे. “भरडधान्य व भारतीय पदार्थांचे जगप्रसिद्ध फ्लेव्हर्स असा संगम असलेल्या पदार्थांची मेजवानी पाहुण्यांसाठी तयार करण्यात येणार आहे. यातून आम्हाला भारतीय संस्कृती, विविधता व वारसा दर्शवायचा आहे. हा एकूणच एक सुंदर अनुभव असेल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत”, असे हॉटेलच्या प्रवक्त्यांनी सांगितले आहे.