अंकिता देशकर
G20 Stray Dogs Cruelty Video: लाइटहाऊस जर्नालिझमला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ समोर आला. नुकत्याच दिल्लीत झालेल्या G20 शिखर परिषदेपूर्वी भटक्या कुत्र्यांना क्रूर पद्धतीने पकडले जात असल्याचा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.
काय होत आहे व्हायरल?
pfa.official च्या Instagram पेजवरच हा व्हायरल व्हिडिओ शेअर करण्यात आला होता, ज्यात अलीकडेच G20 शिखर परिषदेपूर्वी रस्त्यावरून भटक्या कुत्र्यांना क्रूर पद्धतीने हटवल्याचे व डांबून ठेवल्याचे सांगण्यात येत होते.
इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनीही व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
तपास:
या क्लिप तपासून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्ही प्रथम व्हिडिओ डाउनलोड केला आणि InVid वापरून अनेक स्क्रीन ग्रॅब्स घेतल्या. त्याच दरम्यान आम्ही केलेले पहिले निरीक्षण असे होते की, काही व्हिडिओ स्पष्ट दिसत होते, तर बाकीचे अस्पष्ट होते आणि आम्हाला वाटले की हे व्हिडिओ जुने असावेत.
पहिल्या क्लिपमध्ये कुत्र्यांना बांधून मोकळ्या गटारात सोडण्यात आले आहे असे दिसते.
आम्ही क्लिपमधून स्क्रीन ग्रॅब घेऊन कीवर्ड शोधले. आम्हाला २८ ऑगस्ट २०२३ रोजी ट्विटर वापरकर्त्या विकेंद्र शर्माने पोस्ट केलेला व्हिडिओ आढळला. हा व्हिडिओ राजस्थानच्या भिलवाडा येथील आहे.
आम्हाला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर एका पेजवर अपलोड केलेला आढळला.
दुसरी व्हायरल क्लिप जिथे या भटक्यांची सुटका केली जात आहे ती देखील शेअर करण्यात आली होती. क्लिपमध्ये २० सेकंदांनंतर याच व्हिडिओमध्ये व्हायरल क्लिपमधील आणखी एक दृश्य देखील पाहता येते. या कुत्र्यांची सुटका करण्यात आल्याचे अपडेटही ट्विटरवर देण्यात आले.
हा व्हिडिओ पार्श्वनाथ सोसायटी, भिलवाडा, राजस्थान येथील आहे. हे अपडेट २९ ऑगस्ट २०२३ रोजी अपलोड केलेले होते.
दुसरीकडे, आणखी एक क्लिप आहे ज्यात एका पोत्यात दोन कुत्र्यांना बांधून ठेवल्याचे पाहायला मिळतेय. आम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि गुगल रिव्हर्स इमेज सर्च वापरून इंटरनेटवर शोधले. पिंपरी चिंचवड, पुणे येथे पांढऱ्या गोणीत कुत्र्यांना नेण्यात आल्याचे सांगणारी इमेज आम्हाला व्हीएसआरएस न्यूज वेबसाइटवर सापडली.
सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला ही घटना घडली होती. व्हायरल क्लिपमध्ये भटक्या कुत्र्यांना पिवळ्या रंगाच्या व्हॅनमध्ये नेण्यात आले आहे असे दिसते. ही क्लिप भोपाळ महानगरपालिकेतील असल्याचे सुद्धा समोर आले. सहा वर्षांपूर्वी भोपाळ महानगरपालिकेचे अधिकारी कुत्र्यांना बेदम मारहाण करत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर झाला होता.
हा व्हिडिओ झी हिंदुस्थानच्या यूट्यूब चॅनलवर सहा वर्षांपूर्वी शेअर करण्यात आला होता.
पुढील क्लिपमध्ये जिथे एक कुत्रा काही लोक पकडताना दिसत आहे, तिथे गाडीचा नंबर GJ ने सुरू होतो, GJ हा गुजरातचा कोड आहे. त्याच व्हिडिओच्या उपलब्ध असलेल्या व्हिडिओच्या दीर्घ आवृत्तीमध्ये देखील दिल्लीचा असल्याचा दावा केला गेला आहे, यात मागे एका पाद्रीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा एक गुजराती भाषेतील बोर्ड देखील आपण पाहू शकतो. आम्ही DD02 ने सुरू होणाऱ्या काही नंबर प्लेट्स देखील पाहिल्या. नंबर प्लेट दिवचा होता.
आम्ही हा व्हिडिओ दीव ट्रेस केला. फेसबुक युजर तजिंदर कौर रूपराई यांनी हा व्हिडिओ त्यांच्या प्रोफाईलवर दिवमधील क्रौर्याबद्दल अधिक तपशीलांसह २८ ऑगस्ट रोजी घडलेल्या घटनेच्या तपशीलांसह शेअर केला होता..
त्यानंतर आम्ही पुढच्या क्लिपवर गेलो जी आम्हाला २० जुलै २०२१ रोजी Facebook वर अपलोड केलेली होती.
व्हिडिओमध्ये सुमारे 1 मिनिटाच्या सुमारास एक माणूस मुंबई काँग्रेसचा टी-शर्ट घातलेला दिसतो आणि तो व्हिडिओ मुंबईचा असू शकतो. आम्ही या क्लिपची पडताळणी करू शकलो नाही. दिल्ली विमानतळावरून कुत्र्याला हटवल्याचे सांगणारी मीडिया संस्थांनी शेवटची क्लिप वापरली होती.
G20 मुळे भटक्या कुत्र्यांना रस्त्यावरून नेले जात असल्याच्या बातम्या आम्हाला आढळल्या.
दिल्ली नागरी संस्थेने मात्र G20 साठी कुत्र्यांना क्रूरपणे हटवल्याच्या दाव्याचे खंडन केले.
निष्कर्ष: दिल्लीतून रस्त्यावरील कुत्रे हटवल्याचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात रस्त्यावरील कुत्र्यांवरच्या जुन्या क्रूरतेच्या व्हिडिओना एकत्र करून बनवलेला आहे. व्हायरल क्लिप दिशाभूल करणाऱ्या आहेत.