G20 Summit 2023: G20 शिखर परिषद सुरू झाली आहे.संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.या परिषदेसाठी जवळपास सर्व परदेशी पाहुणे आले आहेत. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसोबत शुक्रवारी भारतात आले. या दोघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. यादरम्यान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यांच्या लव्हस्टोरीचे किस्से आपण याआधीही एकले आहेत. सध्या त्यांचे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना कपल गोल्स म्हंटलं आहे.

जी-२० परिषदेसाठी दिल्लीला जात असताना हा फोटो काढण्यात आले होते. या फोटोत अक्षता मूर्ती पालम विमानतळावर उतरण्यापूर्वी तिच्या पतीची टाय जुळवताना दिसत आहे. या चित्रातील साधेपणा लोकांना प्रभावित करणारा आहे. या माध्यमातून एका राजकारण्याच्या वैयक्तिक आयुष्याची एक छोटीशी झलक लोकांना पाहायला मिळाली.

The woman was staring at the Ganesha idol | emotional video
बाप्पा सर्वांना आपला वाटतो! गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहत होती महिला अन् अचानक डोळे भरून आले, पाहा भावुक करणारा VIDEO
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
The beautiful video of Bappa's idol
“रुप तुझे पाहून…” श्रीरामांच्या रुपातील बाप्पाच्या मूर्तीचा सुंदर VIDEO व्हायरल, नेटकरी करतायत कौतुक
ganesh chaturthi young man bike stunt with ganesha idol
खांद्यावर बाप्पाची मूर्ती ठेवत चालत्या गाडीवर उभं राहून तरुणानं केला स्टंट, बाप्पाचं आगळं वेगळं आगमन दाखवणारा VIDEO VIRAL
jewellery, Mahalakshmi, Pratap Singh Rane,
कोल्हापूर : प्रतापसिंह राणे यांच्याकडून महालक्ष्मीला ३० लाखांचे दागिने
Ganesh Chaturthi 2024 18th century Trishundi Ganapati
पुण्यातील तीन सोंडांचा गणपती बाप्पा! १८व्या शतकातील त्रिशुंडी गणपती मंदिर तुम्ही पाहिलेय? मंदिरातील तळघरापासून मूर्तीपर्यंत सर्व गोष्टी रहस्यमय
how to make clay Ganesh idol in just five minutes
फक्त पाच मिनिटांमध्ये शिका, गणपतीची मातीची मूर्ती घरच्या घरी कशी साकारायची? पाहा VIDEO
Ganeshostav 2024 in mumbai boy showing poster of good thoughts goes viral on social media
मुंबईत गणपती बाप्पाच्या मिरवणुकीतली पाटी व्हायरल; ‘हा’ PHOTO तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवाणीलाही त्यांनी उपस्थिती लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी या जोडप्याने पूर्व दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली.

पाऊस असूनही ते गेले, यावेळी या जोडप्याचा छत्रीतला एक रोमँटीक फोटो व्हायरल झाला आहे.या आकर्षक छायाचित्राने अनेकांची मने जिंकली आहेत. तसेच मंदिराच्या आत, ते एकत्र ‘आरती’ करताना दिसले.

हेही वाचा >> G20 मधील पाहुण्यांसाठी हॉटेल ‘ताज महाल’ मधील मेन्यूची खास झलक; नाश्ता ते डिनर, शेफने सांगितला प्लॅन

भारतीय वंशाचे पहिले ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे भारत दौऱ्यावर अतिशय उत्साही दिसले. नेटकऱ्यांनीही त्यांना ‘भारताचा जावई’ म्हणून सोशल मीडियावर घोषित केलं आहे. पत्नी, अक्षता ही इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या असून, त्यांनी भारतासोबतचे संबंध अधिक दृढ केले आहेत. शुक्रवारी या जोडप्याने ब्रिटिश कौन्सिलमध्ये प्रवेश केला, जिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याचे अनेक फोटो ऋषी सुनक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत.