G20 Summit 2023: G20 शिखर परिषद सुरू झाली आहे.संपूर्ण जगाच्या नजरा भारताकडे लागल्या आहेत.या परिषदेसाठी जवळपास सर्व परदेशी पाहुणे आले आहेत. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्तीसोबत शुक्रवारी भारतात आले. या दोघांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे मनापासून स्वागत केले. यादरम्यान ऋषी सुनक आणि अक्षता मूर्ती यांचा एक फोटो व्हायरल होत आहे. यांच्या लव्हस्टोरीचे किस्से आपण याआधीही एकले आहेत. सध्या त्यांचे व्हायरल फोटो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना कपल गोल्स म्हंटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जी-२० परिषदेसाठी दिल्लीला जात असताना हा फोटो काढण्यात आले होते. या फोटोत अक्षता मूर्ती पालम विमानतळावर उतरण्यापूर्वी तिच्या पतीची टाय जुळवताना दिसत आहे. या चित्रातील साधेपणा लोकांना प्रभावित करणारा आहे. या माध्यमातून एका राजकारण्याच्या वैयक्तिक आयुष्याची एक छोटीशी झलक लोकांना पाहायला मिळाली.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आयोजित केलेल्या मेजवाणीलाही त्यांनी उपस्थिती लावली. दुसऱ्या दिवशी सकाळी या जोडप्याने पूर्व दिल्लीतील अक्षरधाम मंदिराला भेट दिली.

पाऊस असूनही ते गेले, यावेळी या जोडप्याचा छत्रीतला एक रोमँटीक फोटो व्हायरल झाला आहे.या आकर्षक छायाचित्राने अनेकांची मने जिंकली आहेत. तसेच मंदिराच्या आत, ते एकत्र ‘आरती’ करताना दिसले.

हेही वाचा >> G20 मधील पाहुण्यांसाठी हॉटेल ‘ताज महाल’ मधील मेन्यूची खास झलक; नाश्ता ते डिनर, शेफने सांगितला प्लॅन

भारतीय वंशाचे पहिले ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक हे भारत दौऱ्यावर अतिशय उत्साही दिसले. नेटकऱ्यांनीही त्यांना ‘भारताचा जावई’ म्हणून सोशल मीडियावर घोषित केलं आहे. पत्नी, अक्षता ही इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांची कन्या असून, त्यांनी भारतासोबतचे संबंध अधिक दृढ केले आहेत. शुक्रवारी या जोडप्याने ब्रिटिश कौन्सिलमध्ये प्रवेश केला, जिथे त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याचे अनेक फोटो ऋषी सुनक यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: G20 summit 2023 from fixing tie to holding umbrella indians declare rishi sunak wife akshata new couple goals srk