अंकिता देशकर

G20 Summit PM Narendra Modi Banner: जी २० शिखर परिषदेसाठी दिल्ली सज्ज झाली आहे. विविध देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत. पण मोदींनी या पाहुण्यांना बोलावून त्यांचा अपमान केला आहे असं सांगणाऱ्या काही पोस्ट सध्या व्हायरल होत आहेत. अशातच लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात असलेले फोटो आढळले. बॅनरमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्यामागे इतर जागतिक नेते दाखवले आहेत. यामध्ये मोदींची लोकप्रियता ही अन्य नेत्यांच्या तुलनेत किती जास्त आहेत हे दाखवणारा आलेख सुद्धा दिसत आहे. यावरूनच जगातील नेत्यांना बोलावून मोदी त्यांना स्वतःचं कौतुक सांगत आहेत, ही पाहुण्यांच्या स्वागताची किती छान पद्धत आहे असे टोले नेटकरी लगावत आहेत. नेमकं हे प्रकरण काय हे जाणून घेऊया…

rahul gandhi rajnath singh
Rahul Gandhi: काँग्रेसचं अनोखं आंदोलन, संरक्षण मंत्र्यांसह सत्ताधारी खासदारांना दिलं गुलाबाचं फूल आणि राष्ट्रध्वज!
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Rahul Gandhi Protest against modi shah
मोदी-अदाणीविरोधात काँग्रेस आक्रमक; राहुल गांधींच्या अनोख्य आंदोलनाने वेधले लक्ष
Sharad Pawar News
Uday Samant : “शरद पवारांचं इंडिया आघाडीबाबतचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे काँग्रेसचा अपमान, राहुल गांधीचं नेतृत्व..” उदय सामंत काय म्हणाले?
Diljit Dosanjh invokes Rahat Indori poetry amid calls to cancel Indore concert
कॉन्सर्ट रद्द करण्यासाठी बजरंग दलाचे आंदोलन, दिलजीत दोसांझ म्हणाला, “किसी के बाप का हिंदुस्तान थोडी है”
Jayant Patil, Islampur Jayant Patil, Jayant Patil Sharad Pawar Group, Jayant Patil latest news,
राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांच्यासमोर मतदारसंघात कडवे आव्हान
Nana Patole Speech About Rahul Narwekar ?
Nana Patole : नाना पटोलेंचं वक्तव्य; “राहुल नार्वेकर यांचं अभिनंदन, मात्र २०८ मतांनी मी निवडून आलो म्हणून टिंगल..”
ajit pawar rahul narvekar
Video: “जे आहे ते आहे, लाडक्या बहिणीनेच आम्हाला…”, अजित पवारांची विधानसभेत स्पष्टोक्ती!

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Global Sanghi ने त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवर फोटो शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील व्हायरल प्रतिमा शेअर करत आहेत.

तपास:

व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला लेखासह वापरलेल्या काही वेबसाइटवर हे फोटो सापडले.

https://www.csmonitor.com/World/2023/0406/Biden-s-democracy-drive-goes-after-global-swing-states
https://www.joplinglobe.com/region/indias-prime-minister-uses-the-g20-summit-to-advertise-his-global-reach-and-court-voters/article_54581584-1f59-5897-87c4-49340c9c4bb0.html

फोटो च्या कॅप्शन मध्ये लिहले होते: FILE: 6 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली, येथे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेत्यांमध्ये सर्वात लोकप्रिय म्हणून असल्याचे सांगणारे होर्डिंग झळकले आहेत. व त्यासमोरून सायकलवर एक माणूस जात आहे. या वर्षीच्या G20 शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या वाढत्या प्रभावावर भर देणारी जाहिरातबाजी केली आहे.
Manish Swarup – staff, ASSOCIATED PRESS

आम्हाला हा फोटो असोसिएटेड प्रेस च्या वेबसाईट वर देखील आढळून आला.

https://newsroom.ap.org/editorial-photos-videos/search?query=billboard%20Narendra%20Modi&mediaType=photo&st=keyword

मनीष स्वरूप यांनी ६ एप्रिल २०२३ रोजी ही गोटो कॅप्चार केला होता. आम्हाला PIB फॅक्ट चेकद्वारे ट्विटरवर एक पोस्ट देखील आढळली.

हे ही वाचा<< “देशाची गरिबी लपवून… “, G20 चे बॅनर्स पाहून तुमचाही होईल संताप! मोदींचा चेहरा असलेल्या पोस्टरची वेगळी बाजू पाहा

निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेले जुने होर्डिंग जी २० परिषदेच्या आधी पुन्हा एकदा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Story img Loader