अंकिता देशकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
G20 Summit PM Narendra Modi: देशात सध्या जी २० समिटची जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असलेले चित्र लाइटहाऊस जर्नालिज्मला आढळून आले. त्यात असा दावा केला जात आहे की हे चित्र २०२३ चे आहे जिथे सरकार महत्त्वाच्या G20 समिट पूर्वी झोपडपट्ट्या लपवत आहे. झोपडपट्टी व देशातील गरिबी लपवून विश्वगुरू जी २० चे सोहळे करत आहेत अशा आशयाचे अनेक ट्वीट सध्या व्हायरल होत आहेत. मोदींचा चेहरा असलेल्या या पोस्टरची एक बाजू तर आपणही कदाचित संतप्त व्हाल पण दुसरी बाजू आम्ही आता तुमच्या समोर आणत आहोत.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर युजर Vijay Thottathil ने व्हायरल चित्र आपल्या प्रोफाइल वर शेअर केले.
इतर वापरकर्ते देखील अलीकडील व्हायरल फोटो शेअर करत आहेत.
तपास:
व्हायरल इमेजवर रिव्हर्स इमेज सर्च करून आम्ही आमचा तपास सुरू केला. आम्हाला हे चित्र Mid Day गुजराती वर एका आर्टिकल मध्ये वापरलेले सापडले.
कॅप्शन मध्ये PTI ला श्रेय देण्यात आले होते. आम्हाला Deccan Herald च्या वेबसाईट वर देखील एक आर्टिकल सापडले आणि त्यात हे चित्र सापडले.
कॅप्शन मध्ये म्हंटले होते, पश्चिम द्रुतगती महामार्गालगत जोगेश्वरी झोपडपट्ट्याबाहेर हिरवे पडदे लावले आहेत कारण मुंबईत G20 बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सौजन्य – पीटीआय)
हे चित्र आम्हाला Hindustan Times वेबसाईट वर देखील एका आर्टिकल मध्ये सापडले.
लेख ११ डिसेंबर २०२२ रोजी पोस्ट केला होता.
निष्कर्ष: गरीबी लपवण्यासाठी झोपडपट्ट्यांवर हिरवे पडदे आणि बॅनर असल्याचा फोटो हा यंदाचा नसून मागील वर्षीचा आहे, शिवाय हे ठिकाणही नवी दिल्ली नसून मुंबईतील आहे.