भारताचे पंतप्रधान नरेंद्र ‘जी२०’ परिषदेसाठी इटलीच्या दौऱ्यावर आहेत. मोदी ग्लासगो येथे आजपासून सुरू होणाऱ्या हवामान परिषदेसाठीही उपस्थित राहणार आहेत. जागतिक अर्थव्यवस्था आणि आरोग्य या विषयावरील या परिषदेच्या पहिल्या सत्रात मोदी भाग घेतला. जी २० देशांच्या अनेक नेत्यांची पंतप्रधान मोदींनी शनिवारी भेट घेतली. या भेटीचे फोटो पंतप्रधान मोदींबरोबरच पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅण्डलवरुन पोस्ट करण्यात आले. मात्र हे फोटो पाहून अनेक भारतीयांना जगभरातील सर्वोच्च नेते जी २० परिषदेच्या ठिकाणी मास्क घालून फिरत असताना मोदींनी मास्क का घातलं नाही असा प्रश्न पडलाय.
परिषदस्थळी इटलीचे पंतप्रधान मारिओ द्राघी यांनी मोदी यांचे स्वागत केले. मात्र त्यावेळेस मोदींनी तसेच मारिओ द्राघी यांनीही मास्क घातलं नव्हतं. मात्र मोदींना खास गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला तेव्हा प्रत्येक सैनिकाने मास्क घातलं होतं.
त्यानंतर जी २० देशांच्या अनेक नेत्यांची मोदींनी भेट घेतली. या भेटीचे काही खास फोटो ट्विटरवर शेअर करण्यात आलेत. अनेक नेत्यांनी भारतीय परंपरेनुसार नमस्कार करत वाकून मोदींचं स्वागत केलं. सिंगापूरचे पंतप्रधान ली सियान लुंग, कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुदो यासारख्या अनेक बड्या नेत्यांची मोदींनी भेट घेतली. मात्र भेटीदरम्यान लुंग यांनी मास्क घातलं होतं तर मोदी मात्र मास्क शिवायच होते.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी तर मास्क घालून मोदींची अगदी गळाभेट घेतली. मात्र यावेळीही मोदींनी मास्क घातलेलं नव्हतं. अनेक नेत्यांच्या भेटीदरम्यान समोरच्या नेत्याने मास्क घातलेलं असतानाही मोदी मास्कशिवाय असल्याचं दिसून आलं.
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा हा फोटो फारच व्हायरल होत असून दोघेही अगदी उत्हासाने चर्चा करताना दिसतायत. यावेळी बायडन यांनी एखाद्या जवळच्या मित्राच्या खांद्यावर हात ठेवतो त्याप्रमाणे मोदींच्या खांद्यावर हात ठेवल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र या फोटोत बायडन यांनी मास्क घातलं असलं तरी मोदींनी मास्क घातलेलं नाहीय.
इतकंच नाही तर मोदींनी या ठिकाणी पोहचल्यानंतर बाहेर भारतीयांची भेट घेताना गर्दी असतानाही मास्क वापरल्याचं फोटोंमध्ये दिसत नाही.
यावरुनच आता भारतीयांनी आश्चर्य व्यक्त करत मोदींना वेगळे नियम होते काय?, मोदींनी मास्क का घातलं नव्हतं? मास्क न घालण्याचा निर्णय चांगल्या फोटोसाठी तर घेतला नाही ना? हे आणि असे अनेक खोचक प्रश्न ट्विटरवरुन विचारले आहेत. हे फक्त फोटोसाठी आहे की मोदींना ही विशेष सूट देण्यात आलीय असे प्रश्नही काहींनी उपस्थित केलेत. भारतीय या बद्दल काय म्हणतायत पाहूयात…
सगळ्यांनी नियम पाळावेत असं मोदी म्हणतात मग तेच का पाळत नाहीत?
सगळ्यांना मास्क घाला सांगत फिरणारे मोदी स्वत: असे का फिरत आहेत?
मास्क कुठे आहे मोदीजी…
सगळे मास्क घालून चाललेत मोदीजी एकटेच…
माझ्या शहरात दंड घेतायत आणि इथे पंतप्रधान…
अरे १०० कोटी लसीकरण केलंय…
काही दिवसांपूर्वी ते विज्ञानाबद्दल बोलत होते…
मास्क पे चर्चा
मोदींनाच सूट का?
मोदी सोडून सगळे मास्कमध्ये…
मोदी फोटोजिवी…
यापूर्वीही पश्चिम बंगाल निवडणुकींच्या वेळी पंतप्रधान मोदींनी प्रचारसभांमध्ये मास्क न वापरल्याचा मुद्दा चर्चेत होता.