Gadar 2 Modi Jindabad Fight Viral Video: सनी देओलचा बहुचर्चित ‘गदर 2: द कथा कंटिन्यूज’ बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे.११ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रदर्शित, अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’ मधून सनी देओल आणि अमिषा पटेल यांनी साकारलेली सकीना आणि तारा सिंगची जोडी पुन्हा प्रेक्षनकांच्या मनात घर करत आहे. मात्र गदर २ च्या या यशाला गालबोट लावणारा एक प्रकार सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलीकडेच ट्विटर (X) वर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये गदर २ च्या शो दरम्यान दोन गटांमध्ये तुफान हाणामारी होत असल्याचे दिसून आले आहे. काही लोकांनी हिंदुस्थान झिंदाबादच्या ऐवजी, मोदी जिंदाबाद व पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्याने हा वाद उफाळून आला असा दावा सुद्धा या व्हायरल व्हिडीओसह शेअर केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय होत आहे व्हायरल?

या घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असून अनेकांनी या व्हिडिओत तथ्य आहे का याविषयी विचारणा केली. ट्विटरवर मोहम्मद झुबेर या फॅक्ट चेकर अकाऊंटवरून या व्हिडीओसंदर्भात माहिती शेअर करण्यात आली आहे. बरेलीतील प्रसाद टॉकीजमध्ये हा प्रकार घडला असून या चित्रपटगृहाच्या मालकांनी सुद्धा दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे मान्य केले आहे. मात्र त्यासाठी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा हे कारण नव्हते तर हे दोन्ही गट मद्यधुंद होते आणि म्हणून त्यांच्यात भांडण झाले असे सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, रविवारी नोएडाच्या लॉजिक्स मॉलच्या थिएटरमध्ये गदर २ च्या स्क्रीनिंगदरम्यान स्क्रीन प्रोजेक्टरने चार वेळा बंद पडल्यावर सुद्धा अशाच प्रकारचा एक गोंधळ झाला होता. प्रोजेक्टरने काम सुरू करण्यापूर्वी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना थिएटरमध्ये पोहोचावे लागले.

हे ही वाचा<< डोंबिवली लोकलमध्ये मोटरमनच्या केबिनमधून प्रवास करणारी ‘ही’ व्यक्ती आहे कोण? २० जुलैला खरं काय घडलं, वाचा सत्य

दरम्यान, १३ ऑगस्ट पर्यंत पहिल्या वीकएंडला गदर २ ने तब्बल 52 कोटींची कमाई नोंदवली होती. चित्रपटाचे पहिल्या आठवड्याचे एकूण कलेक्शन १३५ कोटींच्या पुढे गेले आहे.