श्री गाडगेबाबा हे महाराष्ट्राचे वैभव… गोरगरीबांच्या सेवायज्ञ त्यांनी उभारला. स्वच्छतेचा मंत्र देताना गोरक्षणापासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांनी धर्मशाळा उभारल्या. तळागाळातील गोरगरीबांच्या शिक्षणाची व्यवस्था निर्माण केली. किर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. स्वच्छतेपासून पशुहत्येता विरोधील त्यांचे काम उद्भूत, आदर्श व समाजाला प्रेरणा देणारे… हजारो लोक त्यांच्या या सेवायज्ञात सहभागी झाले व आजही होत आहेत. भाऊराव काळे हे अशांपैकी एक… बाबांच्या गाडीचे सारथ्य अनेक वर्षे त्यांनी केले. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांची प्रकृती व स्मरणशक्ती तल्लख तर आहेच पण आजही गाडगेबाबांच्या विविध धर्मशाळांत जाऊन उत्साहाने जमेल तशी सेवा करतात. बाबांच्या आठवणींचा त्यांनी उलगडून दाखवलेला पट प्रेरणादायी आहे.
लोकसत्ताचे इतर व्हिडीओ पाहाण्यासाठी येथे क्लिक करा